Deepika Padukone ची प्रकृती बिघडली, रूग्णालयात करण्यात आलं दाखल

Deepika Padukone च्या हार्टबीट सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं त्यावेळी वाढल्या होत्या
Deepika Padukone ची प्रकृती बिघडली, रूग्णालयात करण्यात आलं दाखल
Deepika Padukone Health Update

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणची सिनेमाच्या सेटवर प्रकृती बिघडली त्यानंतर तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दीपिका पदुकोण सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाचं शुटिंग करते आहे. या सिनेमात ती दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत झळकणार आहे. हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीत हे शुटिंग सुरू होतं त्यावेळी सेटवरच दीपिकाची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

दीपिका पदुकोण सध्या प्रोजेक्ट के या सिनेमाचं शुटिंग करते आहे. तिच्या हार्टबीट अचानक वाढल्या. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं. आता तिची प्रकृती सुधारली आहे. तिने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. १२ जूनला तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने दीपिकाला हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Deepika Padukone Health Update
Deepika Padukone Health Updateदीपिका पदुकोण, फोटो

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. गहराईयाँ या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं आहे. तिचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. एवढंच नाही तर दीपिकाचा असा एक चाहता वर्ग आहे. दीपिकाच्या आगामी सिनेमाची तो वाट पाहतो आहे. दीपिकाचा पठाण हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिकाने शाहरूखसोबत तिच्या करिअरला सुरूवात केली होती.

आता पठाण सिनेमातून पुन्हा दीपिका शाहरूख स्क्रिन शेअर करत आहे. तसंच फायटर या सिनेमात ती ऋतिक रोशनसोबत झळकणार आहे. तर प्रोजेक्ट या सिनेमात ती प्रभास सोबत झळकणार आहे. याच सिनेमाच्या सेटवर दीपिकाची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला आता बरं वाटत असून तिने सिनेमाचं शूटिंगही सुरू केली आहे.

७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलही नुकताच पार पडला. या महोत्सवात दीपिकाचं नाव ज्युरी मेंबर्सच्या यादीत नाव होतं. दीपिकाने ओम शांती ओम या सिनेमातून आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर रणवीर सिंगसोबत तिने रामलीला, ८३, पद्मावत, बाजीराव मस्तानी असे एकाहून एक हिट सिनेमा दिले. दीपिका आणि रणवीर यांनी लग्नही केलं. या दोघांनाही दीपवीर असं संबोधलं जातं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in