Big Boss 18: आधी ढारढूर झोपले अन् नंतर... बिग बॉसच्या घरात सदावर्तेंचा विषय हार्ड नाही भलताच!

रोहिणी ठोंबरे

Bigg Boss Season 18 : हिंदी बिग बॉसचं सीझन 18 सूरू झालं आहे. या बिग बॉसच्या घरात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी डॅशिंग एन्ट्री मारली आहे. या डॅशिंग एन्ट्रीची चर्चा असतानाच आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिंदी बिग बॉस सीझन 18 मध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी डॅशिंग एन्ट्री मारली

point

महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एन्ट्रीने वेधलं

point

कलर्स टीव्ही आाणि बिगबॉसच्या अधिकृत पेजवर सदावर्तेंचा व्हिडीओ शेअर

Gunaratna Sadavarte, Bigg Boss Season 18 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनवर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. त्यानंतर आता हिंदी बिग बॉसचं सीझन 18 सूरू झालं आहे. या बिग बॉसच्या घरात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी डॅशिंग एन्ट्री मारली आहे. या डॅशिंग एन्ट्रीची चर्चा असतानाच आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या डायलॉगने सर्वच हसून-हसून लोटपोट झाले आहेत. त्यांचं हे आगळंवेगळं रूप पाहून प्रेक्षकांमध्येही हशा पिकला आहे. (bigg boss season 18 gunaratna sadavarte funny dialouges comments and his style goes viral video shared by colors tv on instagram)

बिग बॉस हिंदी सीझन 18 ची सुरूवात रविवारी (6 ऑक्टोबर) झाली. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी धमाकेदार एन्ट्री केली आहे. अशातच महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एन्ट्रीने वेधलं आहे. 

हेही वाचा : Garba Shocking Video: अरे बापरे... गरबा खेळता-खेळता आला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय?

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची केस लढवणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते थेट बिग बॉसच्या घरात गेल्याने अनेकांना आश्चर्य झालं. त्यांच्या खेळाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असून कलर्स टीव्ही आणि बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओतून त्यांची शेरेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. आहे. 

हेही वाचा : ladki Bahin Yojana : महिलांनो! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे; CM शिंदेंनी दिली अपडेट

कलर्स टीव्ही आाणि बिगबॉसच्या अधिकृत पेजवरून सदावर्तेंचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी कमेंट केल्या असून सदावर्तेंचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला आहे. या व्हिडीओवर फनी व्हिडीओ, ये बंदा सबसे अलग है असं लिहित सदावर्तेंचं कौतुक केलं आहे. यावर कलर्सने जर हसायचं असेल तर सर्वात चांगला इलाज, डॉ गुणरत्न यांची मिश्कील शेरेबाजी हास्याचा बेपर्वा राग असल्याचं लिहिलं आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp