अभिनेत्री Malaika Arora च्या वडिलांची आत्महत्या! इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
Malaika Arora Father Suicide : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या
एक्स पती अरबाज खान मलायकाच्या बांद्र्यातील घरी दाखल
वांद्रे पोलीसांकडून चौकशी सुरू
Malaika Arora Father Suicide : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल यांनी आज (11 सप्टेंबर 2024) वांद्रे येथे राहत असलेल्या त्यांच्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. ही घटना सकाळी 9 वाजता घडली. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. माहिती मिळताच मुंबई पोलीस अभिनेत्रीच्या घरी पोहोचले असून चौकशी करत आहेत. मलायका आणि तिच्या कुटुंबासाठी हा खूप दुःखाचा आणि कठीण काळ आहे. (bollywood actress malaika arora father anil arora suicided jump from building at bandra)
ADVERTISEMENT
कुटुंबासोबत अरबाज खान घटनास्थळी दाखल
मलायकाचा एक्स पती अरबाज खानही कुटुंबासोबत घटनास्थळी पोहोचला आहे. अरबाज मलायकाच्या घराबाहेर पोलीस आणि इतर लोकांशी बोलताना दिसला. याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : Gold Rate: सोन्याच्या भावाला डिमांड आली... ओ शेठ आजच्या किंमती पाहून धक्काच बसेल थेट!
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे मूळचे पंजाबचे आहेत. अनिल अरोरा इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते.
हे वाचलं का?
मलायका अरोरा त्यावेळी कुठे होती?
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली तेव्हा मलायका अरोरा घरी नव्हती. ही घटना आज, 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली असून, अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील त्यांच्या घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. मलायका त्यावेळी पुण्यात होती. घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री पुण्याहून मुंबईला रवाना झाली आहे.
हेही वाचा : Viral Video: बाईईई!!! पुराच्या पाण्यात 1.5 किमीपर्यंत कार गेली वाहून, नवरा-बायको छतावर चढले अन्...
अनिल अरोरा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मलायकाचा एक्स पती अरबाज खान कुटुंबासह घटनास्थळी उपस्थित आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT