'2014 पासूनच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं, मी माझ्या मतावर आजही ठाम', विक्रम गोखले पुन्हा तेच म्हणाले

Vikram Gokhale on Real independence: '2014 पासूनच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं', अशी प्रतिक्रिया पुन्हा एकदा अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली आहे.
country got real independence since 2014 I still stand by myself Vikram Gokhale said again
country got real independence since 2014 I still stand by myself Vikram Gokhale said again

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्य हे योग्य आहे असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. ज्यावरुन त्यांच्यावर सातत्याने टीका सुरु आहे. याचबाबत नेमका खुलासा करण्यासाठी विक्रम गोखले यांनी शुक्रवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा असंच म्हटंल आहे की, '2014 पासूनच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं आहे.' यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर विक्रम गोखले यांनी भाष्य केलं आहे.

पाहा स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर विक्रम गोखले नेमकं काय म्हणाले.

'2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत'

'माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाशी आहे. हा माझा अभ्यास आहे. 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे. ते मुळीच बदलणार नाही मी. ते मत मी बदलणार नाही त्यामुळे ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणामध्ये जे तुम्ही लोकांनी दाखवलंच नाही त्या मूळ भाषणामध्ये मी काय म्हणाले आहे.'

'जे अश्रू ढाळणारे स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांचे शिव्याशाप मला मिळतायेत त्यांना कदाचित कळेल विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही.'

'त्या मूळ भाषणामध्ये मी हे म्हणालेलो आहे जे तुम्ही दाखवलेलेच नाहीए. की, मतितार्थ असा आहे... दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल.. मग बाकीचे जे लोक ज्यांनी आपले प्राण दिले, फासावर लटकले गोळ्या घातल्या ब्रिटिशांनी त्यांची अवहेलना झाली याबद्दल आपल्या कोणालाही कसलीही शरम वाटत नाही? त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही?'

country got real independence since 2014 I still stand by myself Vikram Gokhale said again
विक्रम गोखले हे विचारवंत आहेत, विचार करूनच बोलले असतील-अवधूत गुप्ते

'18 मे २०१४ रोजी माझा भारत देश जागतिक राजकीय पटलावर सक्षम देश म्हणून उभा राहिला त्याने सुरुवात केलेली आहे त्याचा मला अभिमान आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ते मला कोणावरही लादायचं नाहीए. ते तुम्ही स्वीकारा न स्वीकारा तुमची मर्जी. मला जेव्हा प्रश्न विचारला त्यावर मी माझं उत्तर दिलेलं आहे. यापेक्षा अधिक या विषयावर बोलायचं नाही.' असं विक्रम गोखले यावेळी म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in