Big Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात मीराच्या राजकारणाने पडली दादूसची विकेट

दादूसला न जिंकवता अक्षयला विजयी करण्यावरून घरात रणकंदन माजलं आणि महिला सदस्यांचा हा निर्णय चुकीचा आहे असं घरच्याचं म्हणणं पडलं.
Big Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात मीराच्या राजकारणाने पडली दादूसची विकेट

बिग बॉसच्या घरात सध्या निराळंच राजकारण सुरू आहे.. काल दादूस आणि अक्षयमध्ये झालेल्या टास्कमध्ये दादूसने अक्षयने केलेली रेसिपी निमूटपणे खाऊन खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन घडवलं. मात्र या टास्कमध्ये विजेता कोण होणार हे महिला सदस्यांनी एकमताने ठरवायचं असतं. मात्र मीरा जग्गनाथने दादूसने खिलाडूवृत्ती दाखवली असली तरी खरा विजेता अक्षयच आहे अशी बाजू धरून ठेवत आपलं राजकारण सुरू ठेवलं यावरून महिला सदस्यात वाद झाले.. आणि दादूसला सोडून अक्षय विजेता असं महिला सदस्यांनी ठरवलं. पण दादूसने यावर आक्षेप घेतल्याने घरात वादाला नवीन सुरवात झाली. दादूसला न जिंकवता अक्षयला विजयी करण्यावरून घरात रणकंदन माजलं.. आणि महिला सदस्यांचा हा निर्णय चुकीचा आहे असं घरच्याचं म्हणणं पडलं. यानंतर राजकारण करणाऱ्या मीराने आपला निर्णय बदलत दादूसच्या पारड्यात आपलं मत टाकलं आणि पलटी मारली.. आणि टास्कची वाट लागत ना अक्षयला गुण मिळाला ना दादूसना

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या टास्कमध्ये पुढची लढत रंगली ती उत्कर्ष आणि विकासमध्ये ... दोघांना महिला वेष परिधान करून डान्स करायचा होता. ज्याचा अँकर होता दादूस.. उत्कर्ष आणि विकासने जोरदार डान्स करत महिला सदस्यांना खूष केलं. मात्र महिला सदस्यांनी उत्कर्षला विजेता केलं. २ गुण मिळवल्याने उत्कर्ष विजेता ठरला आणि त्याने मिळालेल्या विशेष पॉवरने मीराला आपलं सहविजेता घोषित केलं..

आता मीरा आणि उत्कर्ष यांच्यात बिग बॉस सिझन ३ च्या पहिल्या कँप्टनसीसाठी लढत रंगली. ज्यात एक चौकौनी बॉक्स आहे. ज्यावर एका बाजूला उत्कर्ष आणि एका बाजूला मीराचं चित्र आहे. मीराच्या आणि उत्कर्षसाठी मदतीला २ समर्थक आहेत ज्यांनी एका मॅटवर चौकोनी बॉक्स ठेवायचा असून त्यावर आपल्या पार्टनरचा फोटो वरती ठेवणे गरजेचे आहे. ज्यासाठी जोरदार टक्कर सुरू आहे. आता पाहायचं की घरातला पहिला कँप्टन कोण ठरेल उत्कर्ष कि मीरा...

Related Stories

No stories found.