Bigg Boss Marathi 3 : घटस्फोट झालेले स्नेहा वाघ-अविष्कार दारव्हेकर राहणार एकाच घरात

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमीअर जल्लोषात संपन्न
Bigg Boss Marathi 3 : घटस्फोट झालेले स्नेहा वाघ-अविष्कार दारव्हेकर राहणार एकाच घरात

बहुप्रतिक्षित Reality Show बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात कोण-कोण कलाकार सहभागी होणार यावरुन उत्सुकता होती, ती उत्सुकता अखेरीस संपली आहे. या शोमध्ये एक विचीत्र योगायोग पहायला मिळणार आहे.

याआधी प्रत्यक्ष आयुष्यात पती-पत्नी असलेले आणि नंतर घटस्फोट घेतलेल्या स्नेहा वाघ आणि अविष्कार दारव्हेकर यांना एकाच घरात रहावं लागणार आहे. दोघांनाही तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

'काटा रुते कुणाला' या मलिकेतून घराघरात पोहोचलेली स्नेहा वाघ आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अविष्कार दारव्हेकर यांचं लग्न झालं होतं. मात्र काही वर्षात त्यांचे मार्ग वेगळे झाले. वयाच्या १९ व्या वर्षी स्नेहाचं अविष्कारसोबत लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. स्नेहाने घरगुती हिंसाचाराचे आरोप अविष्कारवर केले होते.

दरम्यान, स्नेहा आणि अविष्कार या दोघांनाही ते दोघेही याच शोमध्ये येणार असल्याची माहिती नव्हती. आता एकाच घरात या दोघांमध्ये नेमकी कशी केमेस्ट्री असेल, एकमेकांची साथ देणार की विरुद्ध उभे राहणार हे येत्या काळात दिसून येईल.

Bigg Boss Marathi 3 : घटस्फोट झालेले स्नेहा वाघ-अविष्कार दारव्हेकर राहणार एकाच घरात
Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस'च्या घरात 'या' 15 स्पर्धकांची एंट्री!

पहिल्या नॉमिनेशनने खऱ्या लढाईची सुरुवात होणार आहे. सदस्यांचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोण कोण नॉमिनेट झालं? हे बघणे रंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर झाल्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील.

Bigg Boss Marathi 3 : घटस्फोट झालेले स्नेहा वाघ-अविष्कार दारव्हेकर राहणार एकाच घरात
कसं आहे Bigg Boss मराठीचं यंदाचं घर?

Related Stories

No stories found.