Bigg Boss Marathi 3: एकमेकांवर अंडी,कचऱ्याचा मारा, बिग बॉसच्या घरात सुरू झालं हल्ला बोल

स्पर्धकांच्या चेहऱ्यावर साबणाचं पाणी ,चेहऱ्यावर मारली जातायत अंडी,अंगावर टाकला जातोय कचरा ,चित्रविचित्र अंगविक्षेप करून चिडवाचिडवी हे दृश्य आहे मराठी बिग बॉस सिझन ३ मधलं
Bigg Boss Marathi 3: एकमेकांवर अंडी,कचऱ्याचा मारा, बिग बॉसच्या घरात सुरू झालं हल्ला बोल

स्पर्धकांच्या चेहऱ्यावर साबणाचं पाणी ,चेहऱ्यावर मारली जातायत अंडी,अंगावर टाकला जातोय कचरा ,चित्रविचित्र अंगविक्षेप करून चिडवाचिडवी हे दृश्य आहे मराठी बिग बॉस सिझन ३ मधलं.... नवीन आठवडा सुरू झाल्यानंतर काल नॉमिनेशन पार पडलं .आणि मंगळवारी खऱ्या अर्थाने बिग बॉसच्या खतरनाक टास्कला सुरवात झाली.. मात्र घरातील सदस्य शिवलीलाला बरं नसल्याने बिग बॉसने तिला टास्कमध्ये सहभागी न होता आराम करण्यास सांगितलं. त्यानंतर बिग बॉसने कँप्टन उत्कर्षला हा नवीन टास्क घरातल्या बाकीच्यांना समजावून सांगण्यास सांगितले.. त्याप्रमाणं घरातील अंगणात एक मोटारसायकल ठेवलेली आहे. घरातील स्पर्धकांमध्ये ए आणि बी अश्या टीम करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एका टीमच्या एका जोडीने मोटारसायकलवर बसून राहायचं आहे. आणि दुसऱ्या टीमच्या दोन जोड्यांनी मोटरसायकलवर बसलेल्या त्या जोडीला कोणतीही शारिरीक इजा न करता त्या मोटारसायकलवरून उठवायचं आहे.. त्याप्रमाणे ए आणि बी टीममध्ये याविषयी स्ट्रँटजी ठरवण्यात आली..

पहिल्यांदा बी टीम कडून सुरेखा आणि सोनाली या मोटारसायकलवर बसल्या... ए टीमच्या दादूस आणि तृप्ती ,मीरा आणि स्नेहा आणि गायत्री आणि जय यांनी या दोघींना मोटारसायकलवरून उठवण्यासाठी अनेक प्रकार केले.. सुरेखा आणि सोनालीवर सतत साबणाच्या पाण्याचा मारा करण्यात आला.. तसंच नंतर त्यांच्या डोक्यावर अंडीही फोडण्यात आली.. तृप्तींनी तर घरातला कचराच सुरेखाच्या अंगावर उलटा केला.. हे सगळं होत असताना ए टीम आणि बी टीम यांच्यात तुफान शाब्दिक वार रंगत होता...

सुरेखा आणि सोनाली यांनी बराच वेळ हे सगळे हाल सहन करूनही तग धरला.. मात्र साबणाचे पाणी नाकातोंडात जात असल्याने अखेरीस सुरेखा आणि सोनाली मोटरसायकलवरून उतरल्या.. यानंतर त्यांची जागा घेतली विकास आणि विशालने .. विकास आधीच आपला ग्रुप सोडून गेल्याने जय,गायत्री त्याच्यावर नाराज होते. पर्सनल खुन्नस म्हणून विकास आणि विशालवरही साबणाचं पाणी, अंडी,कचरा याचा सतत मारा करण्यात आला. यादरम्यान मीनल आणि जय यांच्यात तुंबळ शाब्दिक युध्द झालं..मीनल तर चित्रविचित्र हावभाव करून जयला चिडवण्याचा प्रयत्न करीत होती.. उद्याच्या भागात बी टीमचे सदस्य जेव्हा मोटरसायकलवर बसतील तेव्हा ए टीमकडूनही या सगळ्याची खुन्नस काढली जाणार इतकं नक्की आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in