Emergency First Look Out: कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत, पोस्टरची जबरदस्त चर्चा

इमर्जन्सी (Emergency teaser) या सिनेमात कंगना रणौत (Kangana Ranaut) इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारते आहे, त्याचं पोस्टर आणि टिझर पोस्ट करण्यात आला आहे
Emergency first look: Kangana Ranaut is unrecognisable as Indira Gandhi
Emergency first look: Kangana Ranaut is unrecognisable as Indira Gandhi

कंगना रणौत इंदिरा गांधीच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं नाव आहे Emergency. या सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. यामध्ये कंगना अगदी हुबेहूब इंदिरा गांधी यांच्यासारखीच दिसते आहे. वैविध्यपूर्ण भूमिका केलेली कंगना आता इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Emergency first look: Kangana Ranaut is unrecognisable as Indira Gandhi
'अक्षय कुमारनेही गुपचूप फोन केला होता...' कंगना राणौतचा खुलासा

कंगनाचा नुकताच रिलिज झालेला सिनेमा धाकड हा होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काहीही कमाल दाखवू शकला नाही त्यामुळे तो फ्लॉप ठरला. मात्र कंगना आता इमर्जन्सी या सिनेमात इंदिरा गांधींच्या भूमिकेत झळकणार आहे. कंगनाने याआधी मोठ्या पडद्यावर झाशीची राणी आणि जयललिता अशा दोन महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्या पााठोपाठ आता कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

कंगनाने शेअर केलेला हा फोटो आणि त्यासोबत शेअर केलेला टीझर चांगलाच व्हायरल होतो आहे. इमर्जन्सी या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. तसंच कंगनाने इंस्टाग्रामवर या सिनेमाचा पहिला लुक आणि पहिला टिझर पोस्ट केला आहे. हा टिझर आणि पोस्टर पोस्ट केल्यापासून व्हायरल होतं आहे. सोशल मीडियावर आता कंगनाच्याच इमर्जन्सीची चर्चा सुरू झाली आहे.

इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी असताना त्यांनी १९७५ ला आणीबाणी जाहीर केली होती. तो काळ हा त्यांच्या कारकीर्दितला काळा अध्याय होता असं जाणकार सांगतात. आता सिनेमाचं नाव हेच ठेवत कंगना त्यात इंदिरा गांधींची भूमिका साकारते आहे. या सिनेमाच्या टिझरमध्ये कंगना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हा मेसेज देते की मला माझ्या ऑफिसमध्ये सगळे मॅडम नाही तर सर म्हणून हाक मारतात. हा डायलॉग म्हणत असतानाचा कंगनाचा लुक, तिचा अंदाज, तिचा आवाज हा थेट इंदिरा गांधींच्या आवाजाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाशी मिळताजुळता वाटतो.

इंदिरा गांधी यांच्या रोलसाठी कंगनाने चांगलीच मेहनत केली आहे हे हा टिझर पाहून कळतं. तसंच कंगनाला प्रोस्थेटिक मेक अप ज्यांनी केला आहे त्या मेक अप आर्टिस्टनेही कंगना इंदिरा गांधींसारखी दिसावी यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळेच कंगना या टिझरमध्ये हुबेहुब इंदिरा गांधींसारखी भासते आहे.

David Malinowaski यांनी कंगनाचा मेक अप केला आहे. डेव्हिड यांनी त्यांच्या मेकअपसाठी आत्तापर्यंत ऑस्करही जिंकलं आहे. २०१८ मध्ये बाफ्ता, डार्केस्ट अवरसाठी बेस्ट मेक अपचं बक्षीस अशी अनेक बक्षीसं डेव्हिड यांनी जिंकली आहेत. डेव्हिड यांनी बॅटमॅन आणि वर्ल्ड वॉर झेड या सिनेमांसाठीही मेक अप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in