Bigg Boss Marathi 3 च्या घरातून सर्वांचे लाडके दादूस झाले आऊट
Ajay Shriram Parchure

Bigg Boss Marathi 3 च्या घरातून सर्वांचे लाडके दादूस झाले आऊट

या आठवड्यात दादूसउर्फ संतोष चौधरी घरातून बाहेर गेले आहेत. अर्थातच यावेळी घरातून दादूस एलिमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस मराठी' सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. सर्वच स्पर्धक स्वतःला घरात टिकवून ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. या आठवड्यात दादूसउर्फ संतोष चौधरी घरातून बाहेर गेले आहेत. अर्थातच यावेळी घरातून दादूस एलिमिनेट झाले आहेत.

नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये दादूस, मीरा, मीनल, विकास आणि सोनाली नॉमिनेट झाले. ज्यामध्ये दोन सदस्यांना सलमान खानने सेफ केले विकास आणि मीनल आज मीरा आणि दादूस डेंजर झोनमध्ये होते. ज्यामध्ये संतोष चौधरी म्हणजेच दादूस यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या... आणि जे त्यांचा घरामध्ये वा टास्कमध्ये दिसत नाहीत त्यांनादेखील ते कुठे कमी पडत आहेत ते सांगितले. तर घरामध्ये खास पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगले काही आगळेवेगळे टास्क. ज्या सदस्यांनी स्वत:च्या गेमवर नांगर फिरवला आहे असे घरातील इतर सदस्यांना वाटते आहे त्या सदस्यांच्या फोटोवर नांगर फिरवायचा असे सांगितले.

विशालने विकासच्या फोटोवर नांगर फिरवला, तर .... याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे गायत्री – मीरा, विकास आणि सोनालीला सांगितली. ज्यामुळे विकास आणि सोनालीने विशालला त्याचा जा विचारला आणि त्या चुगलीमुळे बरेच दुखावले देखील गेले. तर विशाल आणि जयने यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in