Exclusive: सेक्स आणि हिंसाचार लोकांवर लादला जातोय; ओटीटी कंटेटबाबत नवाझुद्दीननं सोडलं मौन

Exclusive: सेक्स आणि हिंसाचार लोकांवर लादला जातोय; ओटीटी कंटेटबाबत नवाझुद्दीननं सोडलं मौन
exclusive sex and violence are imposed on people nawazuddin siddiqui speaks on ott content

मुंबई: गेल्या काही वर्षांत डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेट पाहायला मिळत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या सीरीज या सातत्याने येत असतात. सुरुवातीला जेव्हा डिजिटल कंटेट प्रयोग केले जात होते, तेव्हा बॉलिवूडमधील काही कलाकारांनीच या प्लॅटफॉर्मवर काम करण्याची जोखीम पत्करली होती. पण आता या ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने परखड मत माडलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठसा उमटवला आहे. नवाजुद्दीनने ज्या पद्धतीने ओटीटीवर आपली छाप सोडली ते पाहता तो या प्लॅटफॉर्मवरचा सर्वात चर्चेत असलेला अभिनेता आहे.

नवाजचा 'सेक्रेड गेम्स' अजूनही नेटफ्लिक्सच्या टॉप सीरिजपैकी एक मानला जातो. काही वेळापूर्वीच नवाजने डिजिटल प्लॅटफॉर्म सोडण्याचे वक्तव्य करून चाहत्यांची निराशा केली होती.

यापुढे कोणत्याही डिजिटल सीरीजमध्ये आपण काम करणार नसल्याचे नवाजने सांगितले होते. 'आज तक डॉट कॉम'शी खास बातचीत करताना नवाजने या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली आहे.

सेक्स आणि हिंसाचार लोकांवर लादला जातोय

नवाज म्हणतो, मी सीरीज तर करणार नाही. ज्या पद्धतीने टीव्ही मालिका ज्या प्रकारे बनविल्या जातात तशाच पद्धतीने आता वेब सीरीज बनविल्या जात आहेत. या नव्या येणाऱ्या वेब सीरीजमध्ये आता विनाकारण लैंगिक अत्याचार आणि हिंसाचार दाखवला जात आहे. एक प्रकारे तो लोकांवर लादला जात आहे. काही सीरीज वगळल्या तर अनेक वेब सीरीजमध्ये जबरदस्तीने सेक्स सीन दाखवले जातात जे पाहून मला राग येतो.

ओटीटीवर सीरीज करणं सोडलं पण चित्रपट करत राहणार!

यावेळी नवाजुद्दीनने हे देखील स्पष्ट केलं आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो सीरीज जरी करणार नसला तरीही या प्लॅटफॉर्मवर चित्रपट करण्यास त्याचा काहीही विरोध नाही. याबाबत नवाज म्हणाला की, 'हो, मी डिजिटलसाठी चित्रपट नक्कीच करेन, पण मी सीरीज करणं सोडलं आहे. या वर्षी माझे अनेक डिजिटल चित्रपट हे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहेत.'

'बॉलिवूडच्या पार्टींमध्ये मला फेकनेस दिसतो'

याच मुलाखतीत नवाझुद्दीनं बॉलिवूडबाबत देखील आपली रोखठोक मतं मांडली आहे. 'मी ज्या पद्धतीचे सिनेमे करतो तसाच मी खऱ्या आयुष्यातही आहे. ते म्हणतात ना की, तुम्ही जेवढं लोकल असाल तेवढंच ग्लोबल बनता. जर आपण आपलं मूळ कायम धरुन राहिलात तर जगातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडू लागता. मी त्याच प्रकारचे सिनेमे करतो आणि तोच माझा स्वभावही आहे.

'माझा अॅटिट्यूड फेक नाहीए. मी सिनेसृष्टीपासून काहीसा अलिप्त राहतो कारण मला स्टारडम, ग्लॅमर हे जग फारसं आवडत नाही. सिनेमा इंडस्ट्रीमधील इव्हेंट्स, पार्टी यामध्ये जाण्याऐवजी मला सामान्य लोकांमध्ये राहणं आवडतं. मला इव्हेंट, पार्ट्यांमध्ये फेकनेस जाणवतो. जे मला पसंत नाही.' असंही नवाझद्दुीनने स्पष्टपणे सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in