Bigg Boss Marathi 3: मराठी प्रेक्षकांबद्दल गायत्री दातारने केलं वादग्रस्त वक्तव्य, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

घरातीतल इतर सदस्यांसोबत बोलत असताना गायत्रीनं मराठी प्रेक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं तिच्यावर टीका होत आहे.
Bigg Boss Marathi 3: मराठी प्रेक्षकांबद्दल गायत्री दातारने केलं वादग्रस्त वक्तव्य, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Ajay Shriram Parchure

'बिग बॉस मराठी ३' हे पर्व सुरू झाले असून आठवड्याभरातच या शोची हवा दिसून येतेय. घरातील सदस्यांची भांडणं , वादग्रस्त वक्तव्यामुळं त्यांची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. अभिनेत्री गायत्री दातार अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. घरातीतल इतर सदस्यांसोबत बोलत असताना गायत्रीनं मराठी प्रेक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं तिच्यावर टीका होत आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्य जय हिंदी रिअॅलिटीमध्येही सहभागी झाला होता. त्यामुळं जय आणि गायत्री प्रेक्षकांबद्दल बोलताना दिसतात. हिंदी आणि मराठी शोमध्ये फक्त भाषेचा फरक असतो , असं जय म्हणतो. याच विषयावर गायत्री त्याच्यासोबत बोलतना दिसत आहे.मराठी सिनेसृष्टीत कसं असतं ना, कलाकार जागृत असतात की, प्रेक्षकांना काय हवं आहे, त्यांना काय चालतं आणि काय आवडत नाही.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील स्पर्धकांना तर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मराठी प्रेक्षक लगेच कलाकारांना जज करतात. त्यातल्या त्यात मराठी कार्यक्रम पाहाताना खूप जज करतात. हिंदी शो पाहाताना इतकं जज करत नाहीत. मराठी अभिनेत्रीनं स्टायलिश कपडे घातले आणि तसेच कपडे हिंदी अभिनेत्रीनं घातले तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. माझ्या फोटोंवर अशा आक्षेपार्ह कमेंट्स आल्या तर मी त्या डिलिट करते', असं गायत्री म्हणताना दिसते.

Related Stories

No stories found.