Mumbai Tak /बातम्या / Gumraah Teaser Out: क्राइम.. थ्रिलर, ‘गुमराह’चा टिझर पाहून तुम्हीही म्हणाल..
बातम्या बॉलिवूड मनोरंजन

Gumraah Teaser Out: क्राइम.. थ्रिलर, ‘गुमराह’चा टिझर पाहून तुम्हीही म्हणाल..

GUMRAAH Teaser Aditya Roy Kapur, Mrunal Thakur: मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांच्या आगामी ‘गुमराह’ (GUMRAAH) या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज झाला आहे. या टीझरने यूट्यूबवर येताच खळबळ उडवून दिली आहे. ‘गुमराह’चा टीझर पाहून असे म्हणता येईल की, आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा हा चित्रपट पूर्णपणे गुन्हेगारी आणि थ्रिलरवर आधारित आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना सस्पेन्सचा आनंद लुटायला मिळणार आहे. प्रेक्षकांना ‘गुमराह’चा हा टीझर व्हिडीओ बराच आवडला आहे. तशा प्रतिक्रिया देखील आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तसेच आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या जबरदस्त अभिनयाचे देखील कौतुक केलं जात आहे. (gumraah is a full dose of crime and thriller aditya roy kapur and mrinal thakurs fearless avatar)

आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) स्टारर ‘गुमराह’चा टीझर (GUMRAAH Teaser) व्हिडिओ अलीकडेच टी-सीरीजने आपल्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत 2 लाख 38 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक या चित्रपटाच्या टीझरचं सध्या बरंच कौतुक करत आहेत. आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्याशिवाय अभिनेता रोनित रॉयही ‘गुमराह’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जिथे एकीकडे मृणाल ठाकूर आणि रोनित रॉय पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर दुसरीकडे आदित्य रॉय कपूर गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Anicka Vikramman : अभिनेत्रीची बॉयफ्रेंडने केली भयंकर अवस्था, सांगितली आपबीती

कधी रिलीज होणार गुमराह सिनेमा?

आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर स्टारर ‘गुमराह’ यावर्षी 7 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांची उत्कंठाही प्रचंड वाढली आहे. आदित्य रॉय कपूरचा हा चित्रपट ‘थडम’चा हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये अभिनेता दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर व्हिडिओ पाहून आपल्याला लक्षात येईल की, यामध्ये थ्रिलर आणि सस्पेन्ससोबतच अॅक्शनही पाहायला मिळणार आहे.

Amitabh Bachchan Health: बिग बींना डॉक्टरांकडून सल्ला, तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट

‘गुमराह’ हा साऊथच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक

OTT वर रिलीज झालेला ‘द नाईट मॅनेजर’ मध्ये आदित्य रॉय कपूर हा अनिल कपूरसोबत दिसला होता. आता आदित्य कपूर हा ‘गुमराह’ सिनेमात दिसणार आहे जो शेवटचा ‘थडम’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

Shah Rukh Khan : पठाणने बाहुबली 2 ला पछाडलं! बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच

टिझरमध्ये नेमकं काय?

जवळपास एक मिनिटाचा हा टीझर आदित्यच्या एंट्रीने सुरू होतो. तो कोणाचा तरी बदला घेण्याचे वचन देताना दिसतो आहे. आदित्य त्याने सहन केलेल्या सर्व वेदना आणि मारहाणीचा बदला घेण्याबद्दल यात बोलत आहे. पण काही काळानंतर, एका प्रकरणात अडकलेल्या आदित्यची दुसरी बाजू आपल्याला पाहायला मिळते. मृणाल या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. जी गुन्हेगाराला शोधण्याचा निर्धार करताना दिसत आहे.

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…