Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा नेमकं काय म्हणाला

शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर बॉलिवूडकर शाहरुखच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून येत आहे
Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा नेमकं काय म्हणाला

कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने छापा टाकला आणि त्यात इतरांसह शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. त्यानंतर मागील काही दिवसांपासून यावरुन चर्चा रंगत आहेत. आज आर्यनला न्यायालयात हजर केले जाणार असून आज त्याच्या सुटकेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्यन खानला अटक झाल्यापासून बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला पाठिंबा दर्शवत आहेत. यात आता बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने आर्यन खान च्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिले की, "आर्यनच्या आयुष्यात आलेल्या हा कठीण काळ त्याला चांगली व्यक्ती बनण्यास मदत करेल आणि उद्याचा दिवस सुर्याप्रमाणे उजळेल."

हृतिक पुढे लिहितो, ' जर तुम्ही या सर्व भावनारुपी राक्षसाला डोळ्यात डोळे घालून गप्प बसवला असाल. तर तुम्ही शांतच राहा त्याच निरीक्षण करा. तुमहाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की मिळेल. मात्र यासाठी आधी तुम्हाला शांत राहावं लागणार आहे. धैर्याने काम करावं लागणार आहे.तुझ्यासाठी खूप प्रेम'. अशी भली मोठी पोस्ट लिहीत हृतिक रोशनने आर्यन खानला दिलासा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in