Bigg Boss Marathi : सोनाली बाहेर काढीन तिथून...महेश मांजरेकरांचा पारा चढला

चावडीवरील चर्चेदरम्यान महेश मांजरेकरांनी घेतली स्पर्धकांची शाळा
Bigg Boss Marathi : सोनाली बाहेर काढीन तिथून...महेश मांजरेकरांचा पारा चढला

बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व आता हळुहळु आपल्या उत्तरार्धाकडे झुकत झाललं आहे. घरात आता ९ स्पर्धक शिल्लक असताना यंदा घराबाहेर कोण जाणार यावरुन सर्वांमध्ये उत्सुकता आहे. आज पार पडणाऱ्या चावडीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांचा सोनाली पाटीलवर चांगलाच पारा चढला आहे.

गेल्या आठवडाभरापासून सोनाली आणि विशाल निकम या दोन स्पर्धकांमध्ये छोट्या-छोट्या कारणावरुन वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सोनालीच्या रिलेशनशिपबद्दल झालेल्या चर्चेमध्ये विशालने सोनाली माझ्या इमोशन्सशी खेळत असल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर विशालशी बोलत असताना चावडीवर सोनाली मध्ये-मध्ये आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती.

यावेळी संतापलेल्या महेश मांजरेकर यांनी सोनालीला, तुला तिथून बाहेर काढीन अशा शब्दांत सुनावलं आहे. ज्यानंतर सोनालीच्या डोळ्यात अश्रू आलेले पहायला मिळाले.

यंदाच्या आठवड्यात सोनाली-विशाल-विकास आणि मीनल यांच्यात अनेक कारणांवरुन छोटे-छोटे वाद झाले. सोनाली पाटील आतापर्यंत अनेकदा नॉमिनेशन प्रक्रीयेत आलेली असली तरीही तिला प्रेक्षकांनी व्होट देऊन वाचवलं आहे. अशा परिस्थितीत यंदा सोनाली घरात टिकून राहणार की बाहेर जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in