Big Boss Marathi 3: सगळ्यांच्या लाडक्या दादूसने बिग बॉसच्या घरात सगळ्यांना रडवलं

बिग बॉसच्या घरात कधीकधी असेही प्रसंग घडतात ज्यामुळे घरातील सगळीच माणसं भावूक होतात. आणि प्रत्येकालाच एखाद्या अश्या गोष्टीमुळे इमोशनल व्हायला होतं.
Big Boss Marathi 3: सगळ्यांच्या लाडक्या दादूसने बिग बॉसच्या घरात सगळ्यांना रडवलं

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरू झाला. नेहमीप्रमाणे पहिल्याच दिवशी घरात राडे,भांडणांना सुरवात झाली... मात्र बिग बॉसच्या घरात कधीकधी असेही प्रसंग घडतात ज्यामुळे घरातील सगळीच माणसं भावूक होतात. आणि प्रत्येकालाच एखाद्या अश्या गोष्टीमुळे इमोशनल व्हायला होतं. ज्याने घराचं वातावरण बदलतं. आणि हेच वातावरण बदलण्याचं काम केलंय... बिग बॉस मराठी ३ चा स्पर्धक संतोष चौधरी अर्थात लाडक्या दादूसने.. असं काय केलं दादूसने ज्याने सगळेच रडायला लागले

मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह दादूस. आगरी कोळी समाजातून बिग बॅासमध्ये झळकणारा दादूस हा पहिलाच कलाकार आहे.. तर झालं असं की बिग बॉसच्या घरात आता सगळे स्पर्धक स्थिरस्थावर झाले आहेत. बिग बॉसच्या घरात आता टास्कला ही सुरवात झाली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात सध्या चिऊताई चिऊताई दार उघड हे टास्क सुरू झाले आहे. ज्यात दोन पुरूष स्पर्धकांमध्ये नवीन टास्क देऊन स्पर्धा खेळवण्यात येते.. यात कालच्या भागात लाडक्या दादूस आणि अक्षय वाघमारेमध्ये थेट स्पर्धा खेळवण्यात आली. ज्यात अक्षय बिग बॉस हॉटेला शेफ बनला होता तर दादूस त्याच हॉटेलमध्ये गेस्ट आला होता.. अक्षयला गेस्ट दादूसला अशी वेगळीच डिश बनवायची होती.. जी डीश दादूस खाऊ शकणार नाही.. आणि तो स्पर्धेतून बाद होईल...

त्याप्रमाणे अक्षयने कारल्याचे आँम्लेट बनवायला घेतलं. पण त्यात त्याने भरपूर मीठ,तिखट आणि गरम मसाला टाकला.. जी डिश दादूस खाणं अशक्यच होतं. इतर स्पर्धकांनाही दादूस ही डिश कशी खातील हा प्रश्नच होता.. मात्र दादूसने खिलाडूवृत्तीने आणि बिग बॉसने दिलेला टास्क म्हणून हे कारल्याचं अॉम्लेट खाण्यास सुरवात केली... ह्याचा त्यांना त्रास होत होता. डोळ्यातून पाणी येत होतं मात्र तरीही दादूस हसत हसत ते कारलं खात होता.. हे पाहून दादूसच्या बाजूला बसलेल्या सर्व स्पर्धकांना रडू कोसळलं.. खासकरून तृप्ती देसाई आणि सुरेखा कुडुची यांना तर धाय मोकळून रडू कोसळलं. त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या अक्षयलाही टास्क असूनही.. दादूस त्याने दिलेली डिश निमूटपणे खात असल्याची कमाल वाटली..

पण दादूसने हार न मानता, डोळ्यातून पाणी येत असतानाही चिकाटीने आपला टास्क पूर्ण केला.. आणि त्यांच्या त्रासाकडे पाहून सगळेच हळहळले... अखेर बिग बॉसलाच दादूसचा त्रास सहन झाला नाही आणि त्यांनी तात्काळ टास्क थांबावयला सांगितला.. आणि दादूस विजयी झाला.. या घोषणेनंतर स्पर्धक टास्क विसरून आपल्या लाडक्या दादूसला मिठ्या मारून रडत होते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात तिसऱ्या दिवशी जरा भावूक वातावरण झाले होते..

Related Stories

No stories found.