'Indian Idol' आता मराठीत, 'अजय-अतुल' परीक्षकांच्या भूमिकेत!

Indian idol Marathi: इंडियन आयडल हा सुप्रसिद्ध शो आता लवकरच मराठीत येणार आहे. ज्याचे परीक्षक हे अजय-अतुल असणार आहेत.
'Indian Idol' आता मराठीत, 'अजय-अतुल'  परीक्षकांच्या भूमिकेत!
indian idol marathi reality show judge ajay atul pune hording

'इंडियन आयडल' हा हिंदीमध्ये गाजलेला छोट्या पडद्यावरील रियालिटी शो आता लवकरच मराठीतही येत आहे. सोनी मराठी पहिल्यांदाच इंडियन आयडल-मराठी हा खास शो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'इंडियन आयडल- मराठी' ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षणही संगीत सृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत.

पुण्यात नारायण पेठ येथे मोठ्या होर्डिंग्सद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली. या वेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते.

अजय-अतुल या जोडीनं आपल्या संगीताचं गारुड महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीने आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातूनच सुरुवात केली आणि त्याच पुण्यात होर्डिंग्सद्वारे त्या दोघांचं नाव 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं.

मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच अशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या होर्डिंग्सची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेत आहे. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे खास होर्डिंग तयार केलं आहे.

दरम्यान, या म्युझिक रियालिटी शोचा नेमका फॉर्मेट कसा असणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात याबाबतची माहिती देखील चॅनलकडून देण्यात येईल.

indian idol marathi reality show judge ajay atul pune hording
Ashi Hi Banwa Banwi: अशी ही बनवाबनवी सिनेमाला झाली ३३ वर्ष पूर्ण,जाणून घेऊ या सिनेमाच्या भन्नाट गोष्टी

मात्र, अजय-अतुल ही संगीतकार जोडी या कार्यक्रमाचं परीक्षण करणार असल्याने आता या कार्यक्रमाबाबत लोकांची उत्सुकता वाढली आहे.

अजय-अतुल ही मराठीतील सर्वात सुप्रसिद्ध अशी संगीतकार जोडी आहे. या जोडीने मराठी सिनेसृष्टीत संगीताचा एक नवा बाज आणला. ज्याने मराठी सिनेसृष्टीतील संगीताची व्याख्याच जणू बदलून गेली. अजय-अतुल यांनी आजवर जेवढ्या मराठी सिनेमांना संगीत दिलं आहे त्या प्रत्येक सिनेमातील गाणी ही सुपरहीट ठरली आहे. अगंबाई अरेच्चापासून सैराटपर्यंत प्रत्येक सिनेमात अजय-अतुलने एकापेक्षा एक हीट अशी गाणी दिली आहेत. त्यामुळेच त्यांच्यासारख्या संगीतकारांसमोर इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांचा चांगलाच कस लागणार आहे.

Related Stories

No stories found.