अरेच्चा! कमाल आर खानने तुरुंगात चक्क पाणी पिऊन काढले दिवस

तुरुंगात त्याने घालवलेल्या 10 दिवसांची सर्व माहिती तो आपल्या चाहत्यांना ट्विटद्वारे देत आहे.
Kamal rashid khan file photo
Kamal rashid khan file photo

बॉलिवूड चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल राशिद खान उर्फ ​​केआरके तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगात त्याने घालवलेल्या 10 दिवसांची सर्व माहिती तो आपल्या चाहत्यांना ट्विटद्वारे देत आहे. केआरके एक एक खुलासे करत आहे. केआरकेचे म्हणणे आहे की तो 10 दिवस तुरुंगात राहिला आणि त्याने 10 किलो वजन कमी केले. तो फक्त पाण्यावरच राहिला. याशिवाय त्याने काहीही खाल्ले नाही. केआरकेने ट्विट करून लिहिले की, 10 दिवस फक्त पाण्यावर जगल्यानंतर मी बाहेर आलो आहे. माझे 10 किलो वजन कमी झाले आहे.

केआरकेचे तुरुंगातील दिवस कसे गेले?

याआधीच्या ट्विटमध्ये केआरकेने बॉलिवूडचे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचे आभार मानले आहेत. मात्र, केआरकेने असे का केले याची माहिती त्याने ट्विटमध्ये दिली नाही. केआरकेने लिहिले की, शत्रुघ्न सिन्हा सर, पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. 11 सप्टेंबर रोजी केआरकेने ट्विट केले होते की, 10 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर तो आता तुरुंगातून बाहेर आला आहे.केआरकेने लिहिले की, मी परत आलो आहे आणि सुरक्षित आहे. मला कोणताही बदला घ्यायचा नाही. माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते मी विसरलो आहे. मला वाटतं हे सगळं नशिबातच होतं, म्हणून घडलं.

केआरकेच्या मुलाने देवेंद्र फडणवीस, अभिषेक आणि रितेशकडे मागितली होती मदत

गेल्या आठवड्यात, केआरकेच्या मुलाने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे अभिषेक बच्चन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रितेश देशमुख यांना टॅग केले आणि लिहिले की त्याच्या वडिलांच्या जीवाला धोका आहे. त्यांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढा, कारण तिथे त्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे. केआरकेच्या मुलाने लिहिले की, मी केआरकेचा मुलगा फैजल कमाल आहे. मुंबईत काही लोक माझ्या वडिलांचा छळ करत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

त्याने लिहलं, मी फक्त 23 वर्षांचा आहे आणि लंडनमध्ये राहतो. मला माझ्या वडिलांना कशी मदत करावी हे माहित नाही? मी अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्या वडिलांचे प्राण वाचवण्याची विनंती करतो. मी आणि माझी बहीण त्यांच्याविना जगू शकणार नाहीत.

काय होतं प्रकरण?

केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तो दुबईहून मुंबईत आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केआरकेला 2020 मध्ये सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. युवासेना नेते राहुल कनाल यांनी एप्रिल 2020 मध्ये KRK विरोधात FIR दाखल केली होती. दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासाठी केआरकेने बरेच वादग्रस्त ट्विट केले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in