Amitabh Bachchan यांच्या ७९ व्या वाढदिवशी केबीसीचा सेट होणार बच्चनमय, वाढदिवसाची चाहत्यांकडून मिळणार खास भेट

Amitabh Bachchan यांच्या ७९ व्या वाढदिवशी केबीसीचा सेट होणार बच्चनमय, वाढदिवसाची चाहत्यांकडून मिळणार खास भेट

७९ व्या वाढदिवसाचं औचित्य साधून कौन बनेगा करोडपती १३ च्या सेटवर दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोख्या पध्दतीने सेलिब्रेशन करण्यात आले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी अनोखा उत्सवच असतो. आज त्यांच्या ७९ व्या वाढदिवसाचं औचित्य साधून कौन बनेगा करोडपती १३ च्या सेटवर दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोख्या पध्दतीने सेलिब्रेशन करण्यात आले आहे. यावेळी सेटवर उपस्थित असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अगदी हटके पध्दतीने शुभेच्छा दिल्या.

कौन बनेगा करोडपती या शो चं आणि अमिताभ बच्चन यांचं वेगळंच एक नातं आहे. याच रियालीटी शोद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते या शोचे होस्ट आहेत. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केबीसच्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस दणदणीत साजरा करण्यात आला.. त्यांचं सिनेमासृष्टीतील योगदान अतुलनीय आहे. आजवर त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून भारतीयांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. अँग्री यंग मँन अशी त्यांची एक वेगळीच ओळख आहे. त्यामुळेच केबीसीच्या सेटवर त्यांच्या या योगदानाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केबीसीच्या सेटवर आलेले प्रेक्षक अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या सिनेमांमधील गेटअपमध्ये आले होते. इथे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक सिनेमांच्या आठवणींना उजाळा दिला.. आज सोमवारच्या केबीसीच्या भागात हा वाढदिवस सोहळा साजरा होणार आहे.

Related Stories

No stories found.