'लतादीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती' राज ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत राज ठाकरे आपल्या शुभेच्छांमध्ये
'लतादीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती' राज ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचं शुभेच्छा कार्ड आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलं आहे. या कार्डमध्ये त्यांनी लतादीदींचा उल्लेख भारताची संस्कृती असा केला आहे.

'लतादीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती' राज ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
'जीवनात ही घडी अशीच राहू दे' म्हणत पद्मजा फेणाणींनी दिल्या लतादीदींना शुभेच्छा!

काय म्हणाले आहेत राज ठाकरे?

1942 मध्ये गांधींजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा अवघा भारत ब्रिटिशांना उद्देशून भारत छोडो चा नारा देत होता, तेव्हा एका तेरा वर्षीय मुलीने भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुढची अनेक दशकं या गायिकेने आपल्या जादुई आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनोजगतावर राज्य केलं. त्या गायिकेचं नाव लता मंगेशकर. आपल्या सर्वांच्या लतादीदी!

दीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीयांची स्वप्नं-आशा-आकांक्षा यांचं प्रतीक आहे. म्हणूनच तर त्यांच्या आवाजाला वय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे कोणतेही शिक्के नाहीत. दीदींचा आवाज म्हणजे एक निखळ सूर आहे, ज्याचा जन्म जरी वेदनेतून झाला असता तरी त्यात आत्मा-परमात्मा यांच्या अद्वैताचा साक्षात्कार आहे.

दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या भारतीय गानकोकीळा लतादीदींना वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

राज ठाकरे

लता मंगेशकर यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. पंतपध्रान नरेंद्र मोदी यांनीही लता मंगेशकर यांना फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या नावाचा ट्विटर ट्रेंडही दिवसभर ट्विटवर ट्रेंड होतो आहे.

Related Stories

No stories found.