Bigg Boss 15 : भेटूया बिग बॉस १५ च्या घरात जाणाऱ्या १५ स्पर्धकांना

बिग बॉस १५ च्या घरात कोण १५ स्पर्धक जाणार हे आता जवजवळ स्पष्ट झालं आहे. आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कोण आहेत हे १५ स्पर्धक
Bigg Boss 15 : भेटूया बिग बॉस १५ च्या घरात जाणाऱ्या १५ स्पर्धकांना

बिग बॉस १५ च्या घरात कोण १५ स्पर्धक जाणार हे आता जवजवळ स्पष्ट झालं आहे. आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कोण आहेत हे १५ स्पर्धक मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये आजपासूनच या बिग बॉस १५ सिझनच्या शूटींगला सुरवात ही झाली आहे.यावेळची थीम आहे जंगल, आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान जीवजंतूसकट या जंगलामध्ये दाखलही होणार आहे. पाहूया या बिग बॉस सिझन १५ मध्ये कोण आहेत ते १५ स्पर्धक

1) करण कुंद्रा

छोट्या पडद्यावरील देखणा कलाकार म्हणून करन कुंद्राचे नाव घेतले जाते. करन कुंद्रा देखील 'बिग बॉस १५' सहभागी झाला आहे. अलिकडेच प्रदर्शित बिग बॉस १५ च्या प्रोमोमध्ये त्याची झलक दिसली होती. करन कुंद्राने कितनी मोहब्बत है, गुमराह, ये रिश्ता क्या कहलाता है सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय त्याने काही रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय करन याने काही सिनेमांत काम केले आहे. त्यामध्ये मुबारकां, १९२१, हॉरर स्टोरी यांचा समावेश आहे.

करण कुंद्रा
करण कुंद्रा Roshni Patel

2) तेजस्वी प्रकाश

तेजस्वी प्रकाश हा लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. त्यने संस्कार, धरोहर अपनों की, स्वरागिनी- जोडे रिश्तों के सुर, पहरेदार पिया की आणि सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकांमध्ये काम केले होते. तेजस्वी प्रकाशचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. तेजस्वी हा इंजिनिअर आहे. परंतु त्याला अभिनयाची आवड असल्याने त्याने याच क्षेत्रात करीअर केले.

तेजस्वी प्रकाश
तेजस्वी प्रकाश

3) विधि पंड्या

उडान या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली गुजराती मुलगी विधी पंड्या.. उडानमधली इमली ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर एक दूजे के वास्तेच्या सीझन २ मध्ये दिसली होती. टीव्हीतली लोकप्रिय सून म्हणून तिची जबरदस्त फँन फॉलोईंग आहे.

विधी पंड्या
विधी पंड्या

4) सिंबा नागपाल

सिंबा नागपालने अलिकडेच रुबीना दिलैक सोबत एक टीव्ही शो शक्ति: अस्तित्व के अहसास की या मालिकेत काम केले. त्याआधी सिंबा स्प्लिट्सविला ११ मध्ये सहभागी झाला आहे. सिंबा एक मॉडेल आहे आणि अनेक जाहिरातींमध्ये त्याने काम केले आहे.

सिंबा नागपाल
सिंबा नागपाल

5) विशाल कोटियन

विशाल कोटियनला छोट्या पडद्यावरचा अक्षय कुमार म्हटलं जातं. १९९८ ला फँमिली नंबर १ या सिरीयलमधून विशालने डेब्यू केलं. त्यानंतर अभिनेता मोहित रैनासोबत डॉन मुथ्थुस्वामीमध्ये त्याने सिनेमातून डेब्यू केला. याशिवाय अकबर बिरबल, कहीं किसी रोज या सिरीयलमध्येही त्याने काम केलं आहे. विशाल एक विनोदी अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध आहे.

विशाल कोटियन
विशाल कोटियन

6) मीशा अय्यर

स्प्लिट्सविला 12 या रियालीटी शोमुळे चर्चेत आलेली आणि मुंबईतली टॉप मॉडेल मीशा अय्यर. एस आँफ स्पेसच्या सीजन १ मध्येही ती दिव्या अग्रवाल आणि प्रतीक सहजपालसोबत दिसली होती. याच शो दरम्यान मीशा आणि प्रतीकमध्ये रंगलेला रोमान्स पुन्हा एकदा बिग बॉसमध्येही पाहायला मिळेल.

 मीशा अय्यर
मीशा अय्यर

7) ईशान सहगल

प्रत्येक सिझननुसार या सिझनमध्येही एक मॉडेल चेहरा असणार आहे जो आहे ईशान सहगल. ईशानने याआधी बिग बॉस सिझन १ चा प्रोमो केला होतो ज्यात तो माहिरा शर्मासोबत दिसला होता. आता तो एक स्पर्धक म्हणून बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे. ईशानने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरवात केली. आणि नंतर तो अनेक म्युझीक व्हिडिओमध्येही दिसला होता.

ईशान सहगल
ईशान सहगल

8) ड़ोनल बिष्ट

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री डोनल बिष्ट बिग बॉस १५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अलिकडेच ती या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे जाहीर झाले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी डोनल पत्रकार म्हणून एका चॅनेलमध्ये काम करत होती. डोनलने २०१४ मध्ये चित्रहार कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून करीअला सुरुवात केली. त्यानंतर तिने एअरलाईन्स, कलश एक विश्वास, एक दीवाना था, रूप मर्द का स्वरूप आणि दिल तो हैपी है जी या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

ड़ोनल बिष्ट
ड़ोनल बिष्ट

9) साहिल श्रॉफ

मॉडलिंगच्या दुनियेतील एक लोकप्रिय नाव म्हणजे साहिल श्रॉफ. मात्र साहिल चर्चेत आला शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा यांच्या डॉन २ सिनेमामुळे. सिनेमातून साहिल फार काही कमाल दाखवू शकला नाही मात्र आता बिग बॉसमुळे त्याच्या करिअरला नवीन वळण मिळेल.

साहिल श्रॉफ
साहिल श्रॉफ

10) अकासा सिंह

नागिन मालिकेचं शीर्षक गीत, तू खींच मेरी फोटो या हिट गाण्याची गायिका अकासा सिंह बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे. इंदीयर रॉ स्टार आणि रिमिक्स असे रियालीटी शो तिने केले आहेत. काही शो ची ती होस्टही होती.

अकासा सिंह
अकासा सिंह

११) उमर रियाज

बिग बॉसच्या १३ व्या पर्वात रनर-अप असलेला आसिम रियाजचा भाऊ उमर रियाज बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाला आहे. उमर रियाजने बिग बॉस १३ मध्ये त्याने खूप लोकप्रियता मिळवली होती. उमर आसिमला बिग बॉस च्या घरामध्ये फॅमिली वीकमध्ये भावाला सपोर्ट करायला आला होता. आता सलमानच्या बिग बॉस १५ कार्यक्रमात रियाज कसा खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.उमर रियाज हा सर्जन आहे. त्याचा जन्म कश्मीरमध्ये झाला. उमरला लहान असल्यापासूनच डॉक्टर व्हायचे होते. आसिमसारखेच रियाजला देखील सोशल मीडियावर खूप चाहते आहे.

उमर रियाज
उमर रियाज

१२)शमिता शेट्टी

निशांत भट्ट याच्याशिवाय अभिनेत्री शमिता शेट्टी देखील बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे सूर जुळले असून त्यांची खूप चर्चा होती. आता ही शमिता बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली आहे.

शमिता शेट्टी
शमिता शेट्टी

१३) प्रतीक सहजपाल

'बिग बॉस १५' च्या घरात जाणारा पहिला कन्फर्म स्पर्धक म्हणून प्रतीकचे नाव आले आहे. प्रतीक 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाला होता. परंतु फिनालेमध्ये तो एक ब्रिफकेस घेऊन स्पर्धेच्या बाहेर गेला. वास्तविक त्या ब्रिफकेसमध्ये 'बिग बॉस १५'मध्ये प्रवेश करण्याचे तिकीट होते. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये प्रतीकने त्याचा खेळ आणि त्याची स्ट्रॅटर्जीमुळे सगळ्यांनाच प्रभावित केले होते.बिग बॉस ओटीटीमध्ये सहा आठवडे घाल्यावल्यानंतर प्रतीककडे अनुभव तर आहेच शिवाय त्याचे स्वतःचे असे चाहतेही आहेत.आता बिग बॉस १५ मध्ये प्रतीक त्याच्या खेळामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे सलमान खानला प्रभावित करू शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रतीक हा मॉडेल तर आहेच शिवाय फिटनेस ट्रेनपबी आहे. त्याने एमटीव्ही लव स्कूल, एमटीव्ही एस ऑफ स्पेस सारख्या रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी झाला होता.

प्रतीक सहजपाल
प्रतीक सहजपाल

१४) निशांत भट्ट

प्रतीक सहजपाल याच्याशिवाय बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक निशांत भट्ट हा देखील सलमान खानच्या बिग बॉस १५ या रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होणार आहे. निशांत हा लोकप्रिय डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. त्याने अनेक सेलिब्रिटिंनी डान्स शिकवला आहे. निशांतने बिग बॉस ओटीटी मधील सर्वात लोकप्रिय आणि आवडता स्पर्धक होता. आता बिग बॉस ओटीटी १५ मध्ये तो कसा खेळतो याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

निशांत भट्ट
निशांत भट्ट

15) अफ़साना खान

बिग बॉस १३' मध्ये पंजाबी संगीत क्षेत्रातील दोन सुंदरी शहान गिल आणि हिमांशी खुराने खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्यानंतर बिग बॉस १४ मध्ये पंजाबी गायिका सारा गुरपाल सहभागी झाली होती. आता असे वाटते आहे की बिग बॉस च्या प्रत्येक पर्वामध्ये पंजाबी तडका असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच बिग बॉस १५ मध्ये असफशाना खानच्या रुपात पंजाबी गायिक सहभागी झाली आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये अफसाना खान दिसली आहे.अफसाना एक प्रसिद्ध पंजाबी गायिका आहे. त्याबरोबरच ती अभिनेत्री आणि गीताकार देखील आहे. तिने २०१२ मध्ये 'व्हॉईस ऑफ पंजाब ३' या रिअॅलिटी कार्यक्रमातून करीअरला सुरवात केली. अफसानाने अनेक लोकप्रिय पंजाबी गाणी गायली आहेत.

अफ़साना खान
अफ़साना खान

Related Stories

No stories found.