'नाय वरनभात लोन्चा...' च्या वादावर महेश मांजरेकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

'नाय वरनभात लोन्चा...' च्या वादावर महेश मांजरेकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर नव्या वर्षात नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं नाव आहे नाय वरनभात लोन्चा कोन नाही कोन्चा. या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आणि त्यावरून वाद निर्माण झाला. काही वादग्रस्त दृश्य आणि शिव्यांचा भडीमार त्यामध्ये आहे.

14 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचं पोस्टर महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात रिलीज केलं होतं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर यातील काही भडक दृष्यांची चर्चा होत आहे. या दृष्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एक महिला आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले आहेत. हे दृश्य या सिनेमातून वगळावं अशी मागणीही करण्यात येते आहे. तूर्तास हा शिव्यांचा भडीमार आणि बोल्ड दृश्यं असलेला ट्रेलर युटयूबवरून हटवण्यात आला आहे. या ट्रेलरविषयी अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे.

काँक्रिटच्या जंगलातलं वास्तव या टॅग लाईनने हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता महेश मांजरेकर यांचं म्हणणंही समोर आलं आहे. या सगळ्या वादावर महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आहेत महेश मांजरेकर?

'माझा चित्रपट टीकाकारांच्या टीकेवर बोलेल. ट्रेलर बघून टीका करणाऱ्या लोकांना मी काय उत्तर देऊ? नटसम्राट, भाई सारख्या माझ्या चित्रपटांना हा विरोध झाला होता. स्लम डॉग मिलेनिअर ही फिल्म ऑस्करला गेली होती. मात्र यासारख्या फिल्मला ही विरोध झाला होता. त्यामुळे माझा सिनेमाच टीकाकारांना उत्तर देईल.' अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिली आहे.

'नाय वरनभात लोन्चा...' च्या वादावर महेश मांजरेकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
चाळ नावाची 'भिकार' वस्ती, मराठी सिनेमा चाळ संस्कृतीबद्दलचा साचेबद्धपणा कधी सोडणार?

महेश मांजरेकर यांनी चाळ संस्कृतीवर आधारीत जे चित्रपट दिग्दर्शित केले त्यात चाळीतलं वातावरण भडक आणि काहीसं उत्तानच दाखवण्यात आलं आहे. वास्तव, प्राण जाये पर शान न जाए, लालबाग पऱळ हे सिनेमा पाहिल्यावर त्यातला भडकपणा काय ते लक्षात येतं. आता नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा हा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरच लोकांनी फारकत घेतली आहे. महिला आयोगानेही यासंदर्भातली दखल घेतली आहे. अशात सिनेमा आल्यानंतर काय होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. महेश मांजरेकर हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत हेच त्यांची प्रतिक्रिया सांगते आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in