'महेश मांजरेकर कोण आहेत? त्यांचं चित्रपटसृष्टीत काय योगदान?'; जितेंद्र आव्हाड संतापले

महेश मांजरेकरांचा सिनेमा येण्याआधीच वादात : ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा
'महेश मांजरेकर कोण आहेत? त्यांचं चित्रपटसृष्टीत काय योगदान?'; जितेंद्र आव्हाड संतापले
महेश मांजेरकर आणि जितेंद्र आव्हाड.Twitter

दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. मात्र, त्यांचा नवा सिनेमा येण्याआधीच वादात सापडला आहे. महेश मांजरेकर 'गोडसे' सिनेमा घेऊन येणार आहेत आणि त्यांनी गांधी जयंतीलाच सिनेमाची घोषणा केल्यानं वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत.

सध्या बिग बॉस मराठी होस्ट करत असलेले अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर महेश मांजरेकर सिनेमा बनवणार असून, तशी घोषणा त्यांनी केली.

महेश मांजरेकर यांनी ऐन गांधी जयंतीलाच गोडसे सिनेमाचा टीझर शेअर करत सिनेमाची घोषणा केली. गोडसेच्या जीवनावरील सिनेमा आणि त्याची गांधी जयंतीला घोषणा केल्यावरून आता महेश मांजरेकरांवर टीका केली जात आहे.

यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गोडसे सिनेमाचं पोस्टर ट्वीट करत कोण आहेत महेश मांजरेकर? असा उपरोधिक सवाल केला आहे.

महेश मांजेरकर आणि जितेंद्र आव्हाड.
'गोडसे' सिनेमा आणणार! महेश मांजरेकरांची गांधी जयंतीच्या दिवशी मोठी घोषणा

'महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं काय योगदान आहे? लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारचं नाटक केलंय', असं म्हणत आव्हाडांनी महेश मांजरेकर यांच्यावर नव्या चित्रपटावरून टीकास्त्र डागलं आहे.

महेश मांजेरकर आणि जितेंद्र आव्हाड.
Veer Savarkar jayanti निमित्त त्यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा

चित्रपटाची घोषणा करताना मांजरेकर काय म्हणाले होते?

'नथुराम गोडसेची गोष्ट नेहमी माझ्या ह्रदयाच्या जवळ राहिली आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. कठीण विषय आणि गोष्ट सांगताना कसलीही तडजोड करायची नाही, यावर मी नेहमीच विश्वास ठेवला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी यापलीकडे जाऊन लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाही किंवा विरोधातही बोलायचं नाही. कोण चूक, कोण बरोबर हा निर्णय आम्ही सर्वस्वी प्रेक्षकांवर सोडणार आहोत', असं मांजरेकर यांनी टीझर रिलीज करताना म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.