Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्पर्धकांना दिल्या जोरदार कानपिचक्या

बिग बॉसच्या चावडीवर शनिवारी महेश मांजरेकरांनी मीरा जग्गनाथची चांगलीच खरडपट्टी काढली.. रविवारीही मांजरेकर त्याच मूडमध्ये होते.
Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्पर्धकांना दिल्या जोरदार कानपिचक्या

बिग बॉसच्या चावडीवर शनिवारी महेश मांजरेकरांनी मीरा जग्गनाथची चांगलीच खरडपट्टी काढली.. रविवारीही मांजरेकर त्याच मूडमध्ये होते.. घरातल्या इतर भांडणांनाही वाचा फोडणं गरजेचं होतं. बिग बॉस सिझन ३ च्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांनी घातलेल्या राड्याने मांजरेकर सरांनी आपला क्लास रविवारीही कायम ठेवला होता.. रविवारी बिग बॉसच्या चावडीवर मांजरेकर सर काय बोलणार त्याआधी उत्कर्ष आणि पार्टी आणि दादूस आणि पार्टी यांच्यात सवाल जवाब रंगला.. एकमेकांवर शाब्दिक कोट्या करत उत्कर्ष आणि पार्टीने आणि दादूस आणि पार्टीने चावडीवर रंगत आणली..

यानंतर सुरू झाली खरी रंगत मांजरेकरांनी स्टोररूममधून भल्यामोठ्या दोन कानांच्या प्रतिकृती मागवल्या..आणि ज्याला कोणाला घरातील कोणत्याही एका सदस्याला कानपिचक्या द्यायच्या आहेत. त्यांचा फोटो लावून दे देण्यास सांगितलं.. सर्वात पहिले तृप्ती देसाई यांनी शिवलीलाला कानपिचक्या दिल्या.. आठवडाभर शिवलीला शांत असून तिने बोललं पाहिजे.. स्वतचं मत मांडलं पाहिजे असं तृप्ती देसाईंनी तिला कानपिचक्या दिल्या.. त्यावर शिवलीलाने मला मर्यादा सोडून बोलता येत नाही.. पण या आठवड्यात तुम्हांला मी माझं जोरदार मत मांडताना दिसेन असं सांगितलं.

नंतर पाळी आली मिनलवर तिने जयचा फोटो लावून जय कसा वाईट भाषा वापरतो घरात आणि हे घर तुझ्या बापाचं नाहीये असं बोलून मला दुखावलं आहे.. त्यामुळे घरात राहियाचं असेल तर शब्दांवर मर्यादा ठेव असं सांगितलं. यावर जय आणि मीनलमध्ये नंतर तुफान तू तू मै मै झाली अखेर मांजरेकरांनी दोघांना शांत केलं तेव्हा कुठे त्यांच्यातील शाब्दिक वार कमी झाले.

शेवटचा वार केला गायत्री दातारने तिने सोनालीचा फोटो लावत तिच्या मोठ्या बोलण्याचा होत असणारा त्रास, तसंच सोनालीने तिच्या हसण्यावर केलेली वाईट कमेंट यावर तिला खडे बोल सुनावले. त्यावर सोनालीने उत्तर देताना आपण कोल्हापूरच्या आहोत आणि मला आहे मोठ्याने बोलायची सवय तेव्हा मी तशीच राहणार जशी मी आहे असं ठाम सांगितलं.. त्यावरही गायत्री आणि सोनालीमध्ये जोरदार वाद झाला...बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार शाब्दिक वॉर होतायत. आता या आठवड्यात कोणी घराबाहेर गेलं नाहीये,पण येत्या आठवड्यात घरातलं राजकारण तापणार आहे. पण मांजरेकरांनी पहिल्याच आठवड्याच्या चावडीवर घरातल्या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे.

Related Stories

No stories found.