Bigg Boss Marathi : तुटलेल्या नात्याला नवी सुरुवात? स्नेहाला मिठी मारत अविष्कार म्हणाला...सॉरी !

सलग दुसऱ्या आठवड्यात कोणाचंही एलिमिनेशन नाही, शिवलिला पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे शो सोडला
Bigg Boss Marathi : तुटलेल्या नात्याला नवी सुरुवात? स्नेहाला मिठी मारत अविष्कार म्हणाला...सॉरी !

बिग बॉस चा शो हा अनिश्चीततेचा शो मानला जातो. या घरात १०० दिवस एकत्र राहताना अनेक नवीन नाती तयार होतात तर अनेकदा तुटलेली नाती नव्याने जोडली जातात. मराठी बिग बॉस च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून सोशल मीडियावरही याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या पर्वात सहभागी झालेले स्पर्धक स्नेहा आणि अविष्कार यांच्या बाबतीत तुटलेलं नातं पुन्हा नव्याने जोडलं जातंय की काय अशी चर्चा सुरु आहे.

बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी अविष्कारला सर्वात कमकुवत खेळाडू म्हणून चार कानपिचक्या दिल्या. तसेच पाच लाख रुपये घेऊन खेळ सोडण्याची ऑफर दिली असतानाही अविष्कारने ती स्विकारल्यामुळे महेश मांजरेकर त्याच्यावर भडकले. या सर्व प्रकारानंतर अविष्कार घरात थोडासा भावूक होऊन रडायला लागला.

Bigg Boss Marathi : तुटलेल्या नात्याला नवी सुरुवात? स्नेहाला मिठी मारत अविष्कार म्हणाला...सॉरी !
Marathi Bigg Boss : जो माणूस स्वतःचा नाही तो...स्नेहा आणि अविष्कारमध्ये उडाले खटके

ज्यानंतर सुरेखा कुडची, विशाल निकम यांनी त्याची समजूत काढली. ज्यानंतर अविष्कारनेही स्नेहाला मिठी मारत तिला सॉरी म्हटलं. हा प्रोमो प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा अविष्कार आणि स्नेहाच्या नवीन नात्याला सुरुवात झाली आहे का अशी चर्चा रंगत आहे. पाहा हा व्हिडीओ...

काही दिवसांपूर्वी हल्लाबोल या टास्कदरम्यानही अविष्कार आणि स्नेहामध्ये चांगलाच वाद रंगला होता. इतर खेळाडूंच्या तुलनेत पहिल्या दोन आठवड्यांच्या टास्कमध्ये अविष्कारचा प्रभाव फारसा दिसत नसल्यामुळे सोशल मीडियावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

काही दिवसांपूर्वी अविष्कार जय दुधाणे सोबत त्याच्या स्नेहासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसलाहोता. अविष्कार जयला म्हणाला की, 'स्नेहासोबतचा घटस्फोट त्याच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट घटना होती. स्नेहाने अविष्कारवर अनेक आरोप लावले होते. अविष्कार जयला म्हणतो की, घटस्फोटानंतर त्याचा कबीर सिंग झाला होता कारण स्नेहापासून वेगळं झाल्यानंतर तो खूप दारू प्यायला लागला होता. त्यावर जय अविष्कारला म्हणतो, 'स्नेहा या घरातली सगळ्यात जास्त जबाबदार, शांत आणि समजूतदार व्यक्ती आहे.' यावर अविष्कार म्हणतो, 'समजूतदार नाही ती प्रचंड तापट आहे. तुला वेळ आल्यावर कळेलच.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in