Bigg Boss Marathi 3 : सगळीकडे बिग बॉस नाही बनायचं, मला राग येतो; मांजरेकरांच्या मीराला कानपिचक्या

यंदाच्या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम
Bigg Boss Marathi 3 : सगळीकडे बिग बॉस नाही बनायचं, मला राग येतो; मांजरेकरांच्या मीराला कानपिचक्या

अखेरच्या काही आठवड्यांपर्यंत येऊन ठेपलेला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा खेळ आता अधिकाधिक उत्कंठावर्धक झाला आहे. या घरात प्रथमेप्रमाणे स्पर्धकांचे गट पडले असून त्यांच्यातलं राजकारण, भांडणं, प्रेम, राग-रुसवे हे प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत. यंदाच्या पर्वात अशीच एक गाजलेली जोडी म्हणजे मीरा जगन्नाथ आणि गायत्री दातार.

एरवी या दोन्ही स्पर्धक खेळांमध्ये घरात वावरताना एकत्र असल्या तरी यंदाच्या आठवड्यात दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पडली आहे. अशातच चावडीवर सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी मीरा आणि गायत्रीला यंदाच्या आठवड्यात झालेल्या भांडणाविषयी प्रश्न विचारला. या चर्चेदरम्यान मीरा मध्येच काहीतरी बोलायला गेली असता, मांजरेकरांनी तिला चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

सगळीकडे बिग बॉस बनू नकोस, मी नसताना बन. मला राग येतो अशा शब्दांत मांजरेकरांनी मीराला सुनावलं आहे.

याआधीही झालेल्या चावडीच्या कार्यक्रमात महेश मांजरेकर यांनी मीराची चांगलीच शाळा घेतली होती. मीराचं घरात सतत आक्रमकतेने वागणं, टास्कदरम्यान सतत भांडणं यावरुन मीराला अनेकदा सल्ले देण्यात आले होते. याच आठवड्यात विकास पाटीलसोबत खेळताना झालेल्या भांडणावरुनही मांजरेकरांनी मीराची कानउघडणी केली.

त्यामुळे यंदाच्या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

Bigg Boss Marathi 3 : सगळीकडे बिग बॉस नाही बनायचं, मला राग येतो; मांजरेकरांच्या मीराला कानपिचक्या
Bigg Boss Marathi : सोनाली बाहेर काढीन तिथून...महेश मांजरेकरांचा पारा चढला

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in