Bigg Boss Marathi 2 चा विजेता शिव ठाकरेच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावला जीव

अमरावतीच्या परतवाडा भागात झाला अपघात
Bigg Boss Marathi 2 चा विजेता शिव ठाकरेच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावला जीव

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेच्या गाडीचा अमरावतीत भीषण अपघात झाला आहे. आपल्या परिवारासोबत देवदर्शनावरुन परतताना अमरावतीच्या परतवाडा परिसरा जवळ हा अपघात घडला असून यात शिव ठाकरे बालंबाल बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिव ठाकरे आपल्या गाडीतून बहिण, भावोजी आणि आपल्या भाचीसोबत परतवाडा येथील गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेतल्यानंतर घरी परत येत असताना शिव ठाकरेच्या गाडीला पाठीमागून टँकरने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की शिव ठाकरेची गाडी शेजारी असलेल्या शेतात ३०० फूट घसरत गेली.

या अपघातात शिव ठाकरेच्या परिवाराला कोणतीही इजा झालेली नसली तरीही त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. शिव ठाकरेच्या डोक्याला ५ टाके पडले आहेत. अपघातानंतर शिव ठाकरेवर नजिकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताबद्दल शिव ठाकरेने पोलिसांत तक्रार दाखल केली नाहीये. टँकर चालक आणि शिव ठाकरेने आपापसात समजून घेत हा मुद्दा संपवल्याचं कळतंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in