Bigg Boss Marathi 3 : टॉवेलवरुन घरात झालं पहिलं भांडण, मीरा-जय मध्ये जुंपली; पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi 3 : टॉवेलवरुन घरात झालं पहिलं भांडण, मीरा-जय मध्ये जुंपली; पाहा व्हिडीओ

पहिल्याच दिवशी घरात वादळी सुरुवात

मराठी मालिका विश्वातला लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस ३ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. वेगवेगळ्या स्वभावाची १५ माणसं एकाच घरात एका छताखाली कशी राहतात आणि त्यातून नेमक्या काय धमाल गोष्टी घडतात याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष असतं. रविवारी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमीअर टीव्हीवर दाखवण्यात आला.

ज्यानंतर पहिल्याच दिवशी घरात भांडणाला सुरुवात झालेली आहे. या भांडणाचं कारण ठरलाय तो म्हणजे टॉवेल.

येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेत मोमो हे पात्र साकारणारी अभिनेत्री मीरा जग्गनाथ हीचं घरात आल्यापासून सदस्यांशी छोट्या-छोट्या कारणावरुन वाजत आहे. सकाळी उठल्यानंतर मीरा आणि स्नेहा यांच्यात जेवणावरुन वाद झाला, त्यानंतर मीरा आणि जयमध्ये टॉवेलवरुन जुंपलेली पहायला मिळाली.

मीराकडे बेडरूमचा सातबारा असल्याने ती बेडरूमची मालकीण आहे. त्यामुळे संपूर्ण बेडरूम कायम व्यवस्थित दिसायला हवं असा तिचा हट्ट असतो. त्यात जयने अंघोळीला जाताना घेतलेला टॉवेल बेडवर ठेवला. त्याला काम सांगण्यात आल्याने त्याचा टॉवेल बेडवर राहिला. मीराने जयकडे टॉवेल जागेवर ठेवण्याची मागणी केली. त्यावर जयने तो टॉवेल ओला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं मात्र मीराने हट्टाने तो टॉवेल जयला पुन्हा पलंगात ठेवायला लावला.

मीराच्या या वागण्यामुळे वैतागलेल्या जयने इतर सदस्यांकडे पाहून डोकं फिरल्याची खूण केली. मीराने हे पाहिल्यानंतर जयसोबत वाद घालत मला डोकं आहे असं म्हणत संपूर्ण घर डोक्यावर घेतलं. त्यामुळे पुढे जाऊन या दोघांमधली केमिस्ट्री कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Bigg Boss Marathi 3 : टॉवेलवरुन घरात झालं पहिलं भांडण, मीरा-जय मध्ये जुंपली; पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi 3 : घटस्फोट झालेले स्नेहा वाघ-अविष्कार दारव्हेकर राहणार एकाच घरात

Related Stories

No stories found.