Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात तुफान राडा, पॅडी कांबळे 'त्या' सदस्यावर प्रचंड भडकला
Bigg Boss Marathi Captaincy Task : बिग बॉसच्या घराला आज नवीन कॅप्टन मिळणार आहेत. गुरूवारी पार पडलेल्या अंड्याच्या टास्कमध्ये ए टीम विजयी ठरली होती. त्यामुळे ए टीममधून निक्कीला सोडून अरबाज, वर्षा,सूरज आणि डिपी दादा हे कॅप्टन्सी पदासाठी दावेदार ठरले आहेत. आता या चार उमेदवारामधून एक सदस्य कॅप्टन बनणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात तुफान राडा
कॅप्टन्सी टास्कमध्ये पॅडी कांबळे भडकला
त्या सदस्यावर सगळा राग काढला
Bigg Boss Marathi Captaincy Task : बिग बॉसच्या घराला आज नवीन कॅप्टन मिळणार आहेत. गुरूवारी पार पडलेल्या अंड्याच्या टास्कमध्ये ए टीम विजयी ठरली होती. त्यामुळे ए टीममधून निक्कीला सोडून अरबाज, वर्षा,सूरज आणि डिपी दादा हे कॅप्टन्सी पदासाठी दावेदार ठरले आहेत. आता या चार उमेदवारामधून एक सदस्य कॅप्टन बनणार आहे. या कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात तुफान राडा होणार आहे. तसेच पॅडी कांबळे (pandharinath kamble) हे वर्षा ताई (varsha usgaonkar) आणि सुरज चव्हाणवर भडकताना दिसले आहेत. (bigg boss marathi pandharinath kamble angry on varsha usgaonkar on captaincy task suraj chavan arbaz patel nikki tamboli bigg boss marathi season 5)
कॅप्टन्सीचा उमेदवार निवडण्यासाठी बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक अनोखा टास्क दिला आहे. कोणाचं गोड पाणी, कोणाची तहान भागवणार? असे या टाक्सचं नाव आहे. प्रोमोमध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारांसमोर चार पाण्याचे डब्बे ठेवण्यात आले आहेत. या डब्ब्यातील पाणी इतर सदस्यांना प्यायचं आहे. याद्वारेच कॅप्टन निवडला जाणार आहे. पण यात एक ट्विस्ट आहे. तो म्हणजे यातलं पाणी खरंच गोड आहे की नाही? याबाबत संशय निर्माण झाला आहे. कारण प्रोमोमध्ये डब्यातील पाणी पिल्यानंतर काही सदस्यांना त्रास होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवसापासून 4500 थेट खात्यात येणार?
गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर टीम बी ला डावलून अरबाज-निक्कीबरोबर Strategy करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंढरीनाथ कॅप्टन्सी टास्कमध्ये त्यांना थेट जाब विचारत म्हणतो, ''तुम्हाला विश्वास होता आम्ही पाणी पिऊ म्हणून'', 'यावर हो असं वाटलं होतं', असे उत्तर वर्षाताई यांनी दिले आहे.स्ट्रेटेजी करायला तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार, अशा शब्दात पॅडी कांबळे यांनी वर्षावर राग व्यक्त केला आहे. त्यामुळे वर्षा यांची बोलती देखील बंद झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तसेच अरबाज या टास्कमध्ये 'हे खूप गोड पाणी आहे' असे म्हणत इतर सदस्यांना त्याच्या डब्यातील पाणी पिण्याचे विनंती करते आहे,असे प्रोमोत दिसतेय. यावर निक्की तंबोळी देखील अरबाजवर भडकली आहे. कालपासून तू इतका कडवा होतास, अचानत तुझं पाणी गोड कसं झालं? असा सवाल निक्की अरबाजला विचारताना दिसली आहे.
हे ही वाचा : Shivdeep Lande: मराठमोळे IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा, महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री की...?
ADVERTISEMENT