Bigg Boss Marathi : एलिमिनेट नसतानाही संग्राम चौगुले घराबाहेर जाणार? 'हे' आहे मोठं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss marathi sangram chougule  take exit from bigg boss marathi season 5 arbaaz patel nikki tamb
संग्राम चौगुले घराबाहेर जाणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संग्राम चौगुले घराबाहेर जाणार?

point

या कारणामुळे बिग बॉसच घर सोडावं लागणार

point

ए टीम पुन्हा मजबूत होणार

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये नुकतीच मिस्टर इंडिया संग्राम चौगुलेच्या (Sangram Chougule) रूपात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. या एन्ट्रीनंतर संग्राम चौगुले अरबाजला (Arbaaz Patel) तोडीस तोड टक्कर देईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण आता संग्राम चौगुले हा फुसकी बार निघाल्याचे घरातले सदस्य म्हणतायत. त्यात त्याला पहिल्याच टाक्समध्ये धाप लागली होती. आणि त्याला गंभीर दुखापत देखील झाली होती. या दुखापतीमुळे त्याला कॅप्टन्सीचा दुसरा टास्क खेळता आला नव्हता. अशात आता अरबाज घराचा नवीन कॅप्टन झाला आहे. त्यात आता एलिमिनेट न होता संग्राम चौगुले घराबाहेर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (bigg boss marathi sangram chougule  take exit from bigg boss marathi season 5 arbaaz patel nikki tamboli) 

ADVERTISEMENT

घरात संग्रामच्या एन्ट्रीचा ट्रेलर खूपच गाजला होता. ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांना वाटले होते, त्याचा पिक्चर देखील लयच भारी असेल. पण अवघ्या काही आठवड्यात प्रेक्षकांच्या या आशा धुळीस मिळाल्या आहेत. बिग बॉसने जशी संग्रामला घरात वाईल्ड एन्ट्री दिली होती. त्याप्रमाणे तो घरात पहिल्याच दिवशी वाईल्ड वागला देखील. बिग बॉसने त्याला नावडत्या सदस्याला पाण्यात ढकलायचा टास्क दिला होता. या टास्कमध्ये त्याने निक्कीने नकार देताना देखील तिला पाण्यात ढकलून दिले होते. यावरून घरात मोठा राडा झाला होता. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : ...तर 4500 हातातून गमावून बसाल, 'ही' चूक आताच टाळा

निक्कीशी भिडल्यानंतर संग्राम अरबाजशी तोडीस तोड भिडेल अशी अपेक्षा होती. मात्र अरबाजने एका टास्कमध्ये युक्ती दाखवून टाक्स जिंकून दिला होता. त्यामुळे अरबाजचा पराभव करण्यात संग्राम अपयशी ठरला होता. त्यात आता अंड्याच्या टास्कमध्ये अरबाज आणि संग्रामची जोरदार भिडत झाली होती. यामध्ये संग्राम गंभीररित्या जखमी झाला होता.

हे वाचलं का?

संग्रामला अंड घरट्यात ठेवण्याच्या टास्कमध्ये डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.  त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. तसेच रिपोर्ट येईपर्यंत संग्रामला डाव्या हाताला जास्त ताण न देण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसने त्याला बोलावून त्याच्या हाताची स्थिती सांगितली होती.त्यामुळे संग्रामला कॅप्टन्सी टास्कमध्ये भाग घेता आला नव्हता. 

हे ही वाचा : Aishwarya-Abhishek Divorce : ...म्हणून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची होतेय तुफान चर्चा, 17 वर्षात बदलल्या 'या' गोष्टी

दरम्यान आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला वैद्यकीय कारणास्तव घराबाहेरही पडावे लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. बिग बॉस लवकरच संग्रामला याबाबत निर्णय कळवणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT