'धर्मवीर' सिनेमा आनंद दिघेंच्या आडून एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवण्यासाठी आणला गेला का?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात या संदर्भातली चर्चा चांगलीच रंगली आहे
'धर्मवीर' सिनेमा आनंद दिघेंच्या आडून एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवण्यासाठी आणला गेला का?
eknath shinde photo during dharmveer promotion movie is anand dighe biopic

एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड पुकारलं ते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी.. म्हणजेच २१ जून रोजी. शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड करत एकनाथ शिंदे यांनी ३५ हून जास्त आमदार फोडले. या सगळ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहचलेत. आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं बंड मानलं जातं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. या बंडाची सुरूवात दोन वर्षांपासून सुरू होती हे आता नाराज शिवसैनिकांकडूनच कळतं आहे. या सगळ्यात आणखी एक चर्चा होते आहे ती म्हणजे धर्मवीर सिनेमाची. हा सिनेमा एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवण्यासाठी आणला गेला का? या सिनेमाची चर्चा सोशल मीडियावरही तेवढीच रंगली होती.

dharmveer movie poster
dharmveer movie poster

धर्मवीर सिनेमात एक डायलॉग आहे, ''नेत्याने कार्यकर्त्याला सांभाळलं तरच कार्यकर्ता नेत्याला सांभाळतो.'' याच डायलॉगची प्रचिती सध्या महाराष्ट्राला येते आहे. सिनेमाची चर्चा सोशल मीडियावरही खूप झाली तसंच हा सिनेमा खूप चालला. या सिनेमात आनंद दिघेंच्या तोंडी डायलॉग आहेत ज्यांना तुम्ही गुंड म्हणत आहात त्यांना एक दिवस तुम्ही सॅल्युट माराल.

dharmveer movie poster based on anand dighe life
dharmveer movie poster based on anand dighe life

त्यानंतर पोलीस हे सिनेमात एकनाथ शिंदेंना सॅल्युट मारताना दिसतात. तसंच दादा भुसे यांना आनंद दिघे म्हणतात की दादा तुम्ही महाराष्ट्राचे कृषीमंत्री व्हाल. त्यावेळी दादा भुसे हसतात. तेव्हा आनंद दिघे म्हणतात की दादा तुम्ही हसा मला आज पण माझे शब्द खरे ठरतील. सिनेमात दादा भुसे कृषी मंत्री झालेले पुढच्याच सीनमध्ये दिसतात.

या सिनेमात आनंद दिघेंची गोष्ट आहे, मात्र प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांना व्यवस्थित फुटेज देण्यात आलं आहे. एकनाथ कुठे आहे हा डायलॉगही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोशल मीडियावर फिरत होता. या सिनेमाच्या प्रमोशनसाठीही एकनाथ शिंदे गेले होते. इतकंच नाही तर सिनेमा पाहताना हे जाणवत राहतं की सिनेमा आनंद दिघेंवर असला तरीही एकनाथ शिंदे यांना मोठं केलं जातं आहे हे लक्षात येतं.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा १३ मे २०२२ ला आला. त्या सिनेमाच्या आधी सिनेमाचं पोस्टर, टिझर, ट्रेलर असं सगळं चर्चेत राहिलं. एकनाथ शिंदे त्यात कुठेही दिसले नाहीत. मात्र सिनेमा पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की सिनेमा आनंद दिघेंवर आधारीत असला तरीही एकनाथ शिंदेंचा राजकारणात उदय कसा झाला? ते कसे सच्चे शिवसैनिक आहेत हे सगळं सांगितलं गेलं आहे. सिनेमात आनंद दिघे ज्यांना ज्यांना कार्यकर्ते म्हणून संबोधत असतात ते सगळे जण आज एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत आहेत.

eknath shinde photo during dharmveer promotion 
movie is anand dighe biopic
'हिंदूहृदय सम्राट','धर्मवीर' अशा पदव्या मागून मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा टोला

दोन वर्षांपासून नाराजी असणं, पक्षाच्या आमदारांच्या विविध तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जाणं, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतानाही उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री केलं जाणं या आणि अशी सगळी कारणं समोर येत आहेतच मात्र धर्मवीर हा सिनेमा बंडाचं तात्कालिक कारण ठरला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगते आहे.

धर्मवीर हा सिनेमा ज्या टायमिंगवर आला आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. सिनेमाचा एक शेवटचा सीन हा उद्धव ठाकरे यांनी पाहिला नाही त्यामुळेही नाराजीत भर पडली असंही म्हटलं जातं आहे. एखादा राजकीय सिनेमा येतो त्याची चर्चा होते ती उगाच नाही. जे काही महाराष्ट्रात घडतंय त्यात धर्मवीर सिनेमाचं टायमिंग लक्षात राहिल यात शंका नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in