‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहणार का? अभिनेते नसीरूद्दीन शाह म्हणाले…

ADVERTISEMENT

naseeruddin shah bollywood senior actor reaction on the kerla story movie box office collection
naseeruddin shah bollywood senior actor reaction on the kerla story movie box office collection
social share
google news

Naseeruddin Shah Reaction on The Kerla Story : दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerla Story) सिनेमाने बॉक्स ऑफिरसवर अक्षरश धुमाकुळ घातला आहे.चौथ्याच आठवड्यात या सिनेमाने 228 करोड रूपयांची कमाई केली आहे. एकिकडे इतर बॉलिवूड सिनेमे कमाईत 100 कोटीचा आकडा गाठायला अडखळत असताना, दुसरीकडे या सिनेमाने 200 कोटीची आकडा पार केल्याने आश्चर्य व्यक्त होतेय. दरम्यान आता ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावर ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी बेधडक प्रतिक्रिया दिला आहे. या प्रतिक्रियेची मनोरंजन विश्वात चर्चा आहे. (naseeruddin shah bollywood senior actor reaction on the kerla story movie box office collection)

इंडिया टुडेशी बोलताना नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah)यांनी ‘द केरळ स्टोरी’वर प्रतिक्रिया दिली आहे. भीड, अफवाह, फराद सारखे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. कोणीही हे सिनेमे पाहायला सिनेमागृहातच गेला नाही. पण तीच लोक द केरळ स्टोरी पाहायला सिनेमागृहात गेली आहेत. मी हा सिनेमा पाहायला नाही, आणि पाहण्याची इच्छाही ठेवत नाही. कारण मी याच्याबद्दल खुप काही वाचलं आहे, असे नसीरूद्दीन शाह म्हणाले आहेत.

हे ही वाचा : राघव चढ्ढा सोबत कधी लग्न करणार? पापाराजीच्या प्रश्नावर परिणीती चोपडा म्हणते…

नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी यावेळी हिटलरच्या काळातील जर्मन देशाचा दाखला दिला. हिटलरच्या काळात सर्वोच्च नेते अशा चित्रपट निर्मात्यांची नियुक्ती करायचे, जे चित्रपटाच्या माध्यमातून सरकारच्या स्तुतीचे पूल बांधायचे, आणि देशवासीयांसाठी काय केले हे दाखवायचे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. या दरम्यान अनेक दिग्गज जर्मन चित्रपट निर्माते देश सोडून हॉलिवूडमध्ये गेले, आणि तिकडे चित्रपट निर्मिती केली. भारतातही तेच घडतेय,एकतर उजव्या बाजूने रहा, किंवा तटस्थ किंवा समर्थक व्हा, असे नसीरूद्दीन शाह म्हणाले आहेत. नसीरूद्दीन शाह पुढे म्हणतात, किती दिवस द्वेष पसरवत राहणार? मला आशा आहे की हे सर्व ज्या प्रकारे अचानक सुरू झाले आहे, ते देखील अदृश्य होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नसीरूद्दीन शाह यांनी कोर्टात जावे

नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्या द केरळ स्टोरीवरील प्रतिक्रियेवर आता भाजप नेते मनोज तिवारी यांनी भाष्य केले आहे. नसीरुद्दीन सर चांगले अभिनेते आहेत पण त्यांचा हेतू चांगला नाहीये. केरळ कथा F.I.R. च्या आधारे तयार केली आहे. पण नसीरुद्दीन शाह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. बोलणे सोपे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. नसीरूद्दीन शाह साहेबांनी ज्या पद्धतीने या विधानाने स्वतःची ओळख करून दिली आहे ती भारतीय म्हणून चांगली नाही, असे देखील ते म्हणाले आहेत.

दरम्यान नसीरूद्दीन शाह यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झांल तर ते ताज: डिवायडेड बाय ब्लड या वेबसीरीजमध्ये अकबरच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये ते सध्या व्यस्त आहेत. ताज: डिवायडेड बाय ब्लड या वेबसीरीजच्या दोन्ही भागांना खास असा प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला नाही आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manvi Raj Singh : रांची ते मुंबई आणि लव्ह जिहाद, मानवीसोबत तनवीरने काय केलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT