अभिनेत्री अनन्या पांडेचा ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध?; एनसीबीने का टाकली घरावर धाड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता शाहरुख खानने आर्यन खानची तुरुंगात भेट घेतल्यानंतर बापलेकांमध्ये काय संवाद झाला, याबद्दलची चर्चा सुरू असतानाच अचानक एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर धाड टाकल्याची माहिती समोर आली. एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या मन्नत बंगल्या गेलं, तर दुसऱ्या पथकाने अनन्या पांडेच्या घरावर धाड टाकली. ही धाड टाकण्यामागचं कारण आता समोर आलं आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स बजावलं आहे. अनन्या पांडेला दुपारी दोन वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तिची नेमकी काय चौकशी होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

अनन्याच्या घरी काय झालं?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एनसीबीचं पथक गुरुवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या मुंबईतील खार वेस्टला असलेल्या घरी धडकलं. यावेळी एनसीबीच्या पथकाने कारवाई करत अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला. त्यानंतर तिला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर होण्यासंदर्भात समन्स बजावलं.

Aryan Khan bail Rejected: ‘आर्यनकडे ड्रग्स नाही मिळाले तरीही तो जेलमध्ये, भारतीकडे 86 ग्रॅम गांजा तरीही जामीन’

ADVERTISEMENT

आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीने त्याचा फोन ताब्यात घेतला होता. त्या फोनमधील व्हॉट्स चॅटमधून बरीच माहिती समोर आल्याचं एनसीबीनं म्हटलं होतं. यात आर्यनने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्ज संदर्भात चर्चा केल्याचीही माहिती समोल आली. मात्र, त्या अभिनेत्रीची ओळख मात्र उघड करण्यात आली नव्हती. त्यामुळे आर्यनच्या फोन ड्रग्जबद्दलची चॅटशी संबंध असलेली ती अभिनेत्री कोण असा प्रश्न उपस्थित होत होता.

ADVERTISEMENT

आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला; हायकोर्टातही लगेच दिलासा नाही

दरम्यान आज एनसीबीने अचानक अनन्याला समन्स बजावल्याने आर्यनच्या ड्रग्ज चॅटशी अनन्याचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. अनन्याच्या चौकशीनंतर एनसीबीकडून याबद्दलची अधिकृती माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. अनन्या पांडे अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी असून, २०१९ मध्ये तिने ‘स्टुडंट्स ऑफ द इयर २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने अनेक सिनेमात भूमिका केल्या आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT