Virat Kohli ची पत्नी अनुष्का शर्माला हायकोर्टाकडून मोठा झटका, प्रकरण काय?

विद्या

ADVERTISEMENT

no relief for actress anushka sharma in sales tax case
no relief for actress anushka sharma in sales tax case
social share
google news

Bombay High Court has refused to grant any relief to actor Anushka Sharma: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) झटका बसला आहे. कारण, महाराष्ट्र विक्रीकर विभागाने ( Maharashtra Sales Tax department) दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी तिची याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी (30 मार्च) फेटाळून लावली आहे. या प्रकरणाबाबत कोर्टाने सांगितले की, ‘याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलाला सांगितले जाते की, त्यांच्याकडे अपील करण्याचे इतर पर्याय आहेत. त्यासाठी त्याला 4 आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.’ (no relief for actress anushka sharma in sales tax case from bombay high court asked to go before appellate authority)

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि अभय आहुजा यांच्या खंडपीठाने सांगितले की, अभिनेत्रीकडे अपील प्राधिकरणासमोर विक्रीकर विभागाविरुद्ध अपील दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, अनुष्का शर्माने तेथे अपील दाखल न करत ती थेट उच्च न्यायालयात आली. त्यामुळे तिने प्रथम अपील प्राधिकरणाकडे अपील दाखल करावं.

अधिक वाचा- Gangubai kathiawadi : पतीने ५०० रुपयांसाठी विकलेली बाई मुंबईची माफिया क्वीन बनली!

त्याच वेळी, विक्रीकर विभागाने उच्च न्यायालयाकडे याचिका फेटाळण्याची आणि अभिनेत्रीला दंड ठोठावण्याची मागणी केली, कारण त्यांच्याकडे MVAT कायद्यांतर्गत पर्यायी उपाय उपलब्ध आहे. मात्र, न्यायालयाने हे मान्य केले नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे संपूर्ण प्रकरण

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (MVAT) कायद्यांतर्गत महाराष्ट्र विक्रीकर विभागाने 2012-13, 2013-14, 2014-15 आणि 2015-16 या वर्षांसाठी अनुष्का शर्मावर विक्री कर लावला होता. त्यासाठी चार नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. ज्यांच्या विरोधात अभिनेत्रीने उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करून या नोटिसांना आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना हायकोर्टाच्या खंडपीठाने म्हटले की, “याचिकाकर्त्यांकडे (शर्मा) कायद्यान्वये अपील करण्याचा दुसरा पर्याय असताना आम्ही तुमच्या याचिकांचा विचार का करावा?. तुमच्याकडे कायदेशीर तरतुदी उपलब्ध आहेत.”

न्यायालयाने अनुष्का शर्माच्या याचिका फेटाळून लावताना तिला चार आठवड्यांच्या आत उपविक्रीकर आयुक्त (अपील) यांच्याकडे अपील दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक, या कायद्यात असा नियम आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती येथे अपील करते, तेव्हा त्याला विभागाने लागू केलेल्या एकूण कराच्या 10 टक्के रक्कम जमा करावी लागते.

ADVERTISEMENT

अनुष्कावर विक्रीकर का लावला?

विक्रीकर विभागाचा असा दावा आहे की, अनुष्का शर्मा ही कोणत्याही अवॉर्ड फंक्शन किंवा स्टेज शोमध्ये तिच्या परफॉर्मन्सवर “कॉपीराइटची पहिली मालक” आहे आणि त्यामुळे ती यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर विक्रीकर भरण्यास जबाबदार आहे. अनुष्काने अशा कार्यक्रमांच्या आयोजकांकडून कॉपीराइट ‘हस्तांतरित’ करण्यासाठी शुल्क आकारले असल्याने त्याकडे विक्री (Sales) म्हणून पाहिले गेले. यासाठी तिला अशा प्रकारे मिळणाऱ्या एकूण उत्पन्नावर विक्रीकर जमा करावा लागेल.

ADVERTISEMENT

अधिक वाचा- आधुनिक महिलांना आळशी म्हणणारी सोनाली कुलकर्णी झाली ट्रोल, आता म्हणाली..

त्याच वेळी, अभिनेत्रीने असा युक्तिवाद केला की, जो अभिनेता चित्रपट, जाहिरात किंवा स्टेज/टीव्ही शोमध्ये काम करतो त्याला निर्माता म्हणता येणार नाही आणि म्हणून अभिनेता किंवा अभिनेत्रीचा त्या कार्यक्रमावर कॉपीराइट नाही. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी केवळ आणि फक्त कलाकार म्हणून काम केले होते, असं तिने म्हटलं आहे. अनुष्काने तिच्या याचिकेत असेही नमूद केले आहे की, व्हिडिओचा कॉपीराइट नेहमीच निर्मात्याकडे असतो, वास्तविक मालक तिथे असतो, कलाकारांची त्या प्रकरणांमध्ये कोणतीही भूमिका नसते.

अॅडव्होकेट दीपक बापट यांनी अनुष्का शर्मा यांची बाजू मांडताना असा युक्तिवाद केला की, मूल्यांकन अधिकारी (AO) ने अॅवॉर्ड फंक्शनमध्ये जाहिरात आणि अँकरिंगसाठी मिळालेल्या रकमेवर चुकीच्या पद्धतीने विक्री कर आकारला. त्यांनी असाही युक्तिवाद केला की, विक्रीकर अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने असे गृहीत धरले की अँकरिंग आणि अवॉर्ड फंक्शन्सद्वारे, त्यांनी कॉपीराइट मिळवला, जो अमूर्त स्वरूपाचा (Intangible Nature) आहे, आणि नंतर तो विकला किंवा हस्तांतरित केला.

अधिक वाचा- malaika arora: फॅन्समुळे मलायका संकोचली, विमानतळावर काय झालं?

अनुष्कावर किती कोटींचा सेल्स टॅक्स?

अनुष्काला 2012-13 या वर्षासाठी 12.3 कोटी रुपयांवर 1.2 कोटी विक्रीकर आकारण्यात आला आहे. तर 2013-14 साठी 17 कोटींवर 1.6 कोटी रुपयांचा विक्रीकर लावण्यात आला आहे. विभागाने 2021 ते 2022 दरम्यान हे आदेश पारित केले आहेत.

अभिनेत्रीकडे आता कोणते पर्याय?

हायकोर्टाने सांगितले की अनुष्का शर्माने तिच्या याचिकांमध्ये उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर अपीलीय अधिकारी निर्णय घेऊ शकतात. कोर्ट म्हणाले, “अधिकारी सर्व मुद्द्यांचा विचार करेल आणि सविस्तर तपास करेल. आम्ही हे ठरवायला बसलो तर MVAT कायद्याचे प्रत्येक प्रकरण येथे येईल.” म्हणजेच, आता अनुष्काला प्रथम विक्री विभागातील अपील प्राधिकरणासमोर अपील दाखल करावे लागेल, ज्यावर ती निकालानंतर उच्च न्यायालयात जाऊ शकते.

थर्ड पार्टी अॅग्रीमेंट अंतर्गत केला परफॉर्मन्स – अनुष्का

अनुष्का शर्माच्या याचिकांनुसार, संबंधित कालावधीत तिने त्यांचे एजंट, यशराज फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि निर्माते/इव्हेंट आयोजकांसोबत थर्ड पार्टी करारांतर्गत चित्रपट आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये परफॉर्मन्स केले होते. तिच्या याचिकांमध्ये असेही म्हटले आहे की, मूल्यांकन अधिकाऱ्याने चित्रपटासाठी मिळालेल्या शुल्कावर विक्री कर लावला नाही, तर उत्पादनांच्या जाहिरातींवर आणि पुरस्कार सोहळ्यातील अँकरिंगवर लावला आहे. कारण अनुष्का शर्माने परफॉर्मरचे अधिकार हस्तांतरित केल्याचे विभागाने मान्य केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT