Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेच्या विरोधात राडा. किस मागितल्याने अभिनेत्रीने घातला गोंधळ

अभिजित बिचुकले यांनी स्वतःच्या गालाकडे बोट दाखवत अभिनेत्री देवोलीना हिच्याकडे पाहून किस मागितला आहे. घरात झालेला हा राडा अभिजित बिचुकले यांच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे.
Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेच्या विरोधात राडा. किस मागितल्याने अभिनेत्रीने घातला गोंधळ

हिंदी बिग बॉसचा सिजन ह्यावेळी तेजस्वी प्रकाश आणि कारण कुंद्राच्या रिलेशनशिपमुळे चांगलाच गाजला आहे. मात्र त्यांचे हे प्रेम खरे नाही, अशी टीका त्यांच्यावर वारंवार केलेली पाहायला मिळते. ह्यावर सलमान खानने देखील त्यांचं प्रेम फेक असल्याचं म्हटलं होतं. जेव्हा पहाटे ४ वाजता तेजस्वी प्रकाशला स्विमिंगपुलमध्ये उडी मारावीशी वाटली, त्यावेळी सलमानने त्याच्या नात्यात दुरावा आहे असे म्हटले होते.

हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन हिट ठरावा म्हणून अनेक युक्त्या केलेल्या पाहायला मिळाल्या. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांनी हजेरी लावली होती. बिग बॉसच्या घरात त्यांच्यामुळे खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे घरातील सर्वच स्पर्धक त्यांना आदराने दादा अशी हाक मारतात. सगळ्या सदस्यांसोबत त्यांची खूप छान मैत्री देखील झाली आहे.

पण या मैत्रीला आता चांगलंच गालबोट लागलेलं पाहायला मिळतं आहे. बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांनी स्वतःच्या गालाकडे बोट दाखवत अभिनेत्री देवोलीना हिच्याकडे पाहून kiss मागितला आहे. घरात झालेला हा राडा अभिजित बिचुकले यांच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे. बिग बॉसच्या घरात एक टास्क देण्यात आला होता. त्यात म्युझियम मधील वस्तू सदस्यांना चोरायच्या होत्या. अभिजित बिचुकले हे देखील त्या टास्कचा एक भाग होते. त्यांनी तिथली एक वस्तू पाठीमागे लपवली आणि देवोलीनाचा गाल ओढून ‘तेरे लिये मै कुछ भी कर जाऊंगा’ असे म्हणतात. त्यानंतर अभिजित बिचुकले स्वतःच्या गालावर बोट ठेऊन देवलीना ‘ये कब करेगी तू’ असे म्हणत गालावर किस मागतात. त्यावर देवोलीना प्रचंड संतापते आणि अभिजित बिचुकलेंना धारेवर धरते. आपको मैने कितनी बार वॉर्निंग दि है की, आप लाईन क्रॉस नहीं करेंगे मेरे साथ. मेरे अच्छाई का फायदा अगर आप उठाओगे तो मुझसे बुरा कोई नहीं होगा.

दरम्यान देवोलीनासोबत बिचुकले यांनी गैरवर्तन केलं आहे का असे सगळे सदस्य बिचुकलेना जाब विचारत असतात. स्वतः राखी बिचुकलेना ह्या वर्तवणुकीबाबत विचारत असते, त्यावेळी मै सिर्फ मजाक कर रहा था, असे ते म्हणतात. दरम्यान ह्या प्रकरणामुळे घरातील वातावरण तापलेले पाहायला मिळाले. यातच तेजस्वी देवोलीनाला बिचुकलेंनी ब्लॅकमेल केलं का म्हणून विचारते, यावर हो म्हणताच तेजस्वी जाऊन भांडू लागते. मी तुमच्या इतक्या जवळ आहे की मी कानाखाली वाजवू शकते. बिचूकलेंनी केलेली ही मस्करी आता त्यांच्याच अंगलट आलेली पाहायला मिळणार आहे. यावर प्रेक्षकांनी मात्र उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसने त्यांना घरातून बाहेर काढावे अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिलेली पाहायला मिळते आहे. या प्रकरणावर बिचुकले आपली बाजू कशी मांडतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in