International एअरपोर्टवर अवतरली ‘चंद्रमुखी’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी एकदम गजबजून गेले होते. सर्वत्र ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत होते.

या उत्साही वातावरणात विमानतळावर लावण्यवती ‘चंद्रमुखी’ अवतरली होती. आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी ‘चंद्रा’ने उपस्थितांना घायाळ केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी ‘चंद्रा’ने सादर केलेल्या या नृत्यात हवाईसुंदरींनीही ठेका धरला. मराठी सिनेसृष्टीत एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारे प्रसिद्धी देण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.

स्पाईसजेटच्या विमानावर यावेळी ‘चंद्रमुखी’चे पोस्टरही झळकले.

ADVERTISEMENT

पुण्यातील मेट्रोमध्ये प्रवाशांना आपल्या सूरतालात दंग केल्यानंतर आता ‘चंद्रा’ने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपला जलवा सादर केला.

ADVERTISEMENT

‘चंद्रा’ म्हणजेच अमृता खानविलकर आणि ‘दौलतराव देशमाने’ म्हणजेच आदिनाथ कोठारे यांनी 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा ‘चंद्रमुखी’ सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहनही केले.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कंपनी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे हे प्रमुख भूमिकेत होते.

त्यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकार आहेत.

सध्या या चित्रपटाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा नेमकी किती कमाई करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT