Advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार रणदीप हुड्डा; 'या' ठिकाणी होणार शुटिंग

महेश मांजरेकरांच्या महत्त्वांकांक्षी चित्रपटाचं लवकरच शुटिंग होणार सुरू
स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार रणदीप हुड्डा; 'या' ठिकाणी होणार शुटिंग

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या आयुष्यावरील चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार या ठिकाणी चित्रपट शूट केला जाणार आहे.

महेश मांजरेकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्य पटडद्यावर घेऊन येत असून, त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा प्रमुख भूमिकेत असणार आहे. रणदीप हुड्डाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहे. 'सरबजीत'च्या सिनेमातही तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांची भूमिका साकारत आहे.

275826573019101

तीन ठिकाणी होणार चित्रीकरण

स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे शूटिंग या वर्षीपासून म्हणजेच जून २०२२ पासून सुरू होत आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहातील विविध ठिकाणी चित्रीकरण केलं जाणार आहे. सावरकरांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच चित्रपटातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवरही प्रकाश टाकला जाणार आहे.

चित्रपट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल निर्माते संदीप सिंग बोलताना, "भारतात असे फार कमी कलाकार आहेत, जे त्यांच्या प्रतिभेने जादू निर्माण करू शकतात आणि रणदीप त्यापैकीच एक आहे. वीर सावरकरांना भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त पात्र मानताना मी फक्त रणदीपचाच विचार करू शकतो. वीर सावरकरांचे योगदान दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. मला आश्चर्य वाटते की, आपल्या इतिहासाच्या पुस्तकात वीर सावरकरांचा उल्लेख का नाही?"

चित्रपटाचे दुसरे निर्माते आनंद पंडित म्हणाले, “सिनेमा हे एक सर्जनशील माध्यम आहे जे विविध विचारप्रक्रिया साजरे करते. स्वातंत्र्यवीर सावरकर यासारखे चित्रपट अधिक जागृती करण्यात मदत करतील. महेश आणि रणदीप यांच्यासोबत, मला खात्री आहे की आम्ही प्रेक्षकांसाठी काहीतरी अविस्मरणीय बनवू."

"आम्ही ज्या कथांकडे दुर्लक्ष केलं होतं ते सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक उत्कंठावर्धक सिनेमॅटिक कथन असेल, जे आपल्याला आपल्या इतिहासाची उजळणी करण्यास भाग पाडेल. मला संदीप सिंगसोबत काम करायचे होते आणि हा चित्रपट आम्ही एकत्र करत आहोत याचा मला आनंद आहे”, असं महेश मांजरेकर यांनी चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं.

आव्हानात्मक भूमिकेबद्दल रणदीप हुड्डा म्हणाला...

"असे अनेक नायक आहेत, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भूमिका बजावली आहे. मात्र, प्रत्येकाला योग्य सन्मान मिळालेला नाही. विनायक दामोदर सावरकर हे अशाच नायकांपैकी सर्वात आहेत आणि त्यांची कथा सांगायलाच हवी. स्वातंत्र्यावीर सावरकरांसाठी 'सरबजीत' नंतर संदीपसोबत काम करताना मला खूप आनंद होतो. ही भूमिका निभावणे आणखी एक आव्हानात्मक असेल."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in