'गोडसे' सिनेमा आणणार! महेश मांजरेकरांची गांधी जयंतीच्या दिवशी मोठी घोषणा

गांधी जयंतीच्या शुभेच्छा देत नव्या सिनेमाची घोषणा
'गोडसे' सिनेमा आणणार! महेश मांजरेकरांची गांधी जयंतीच्या दिवशी मोठी घोषणा

महात्मा गांधी यांची आज जयंती. या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. विविध सामाजिक संघटना, काँग्रेस पक्ष, त्यातले नेते हे महात्मा गांधींना अभिवादन करत आहेत. अशात दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचं नाव आहे गोडसे.

जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं 'बापू' आपका नथुराम गोडसे असं एक ओळ लिहिलेलं आणि गोडसे हे नाव असलेलं सिनेमाचं पोस्टर काही वेळापूर्वीच रिलिज करण्यात आलं आहे.

Mahatma Gandhi
Mahatma Gandhi Photo- India Today

महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती आहे या निमित्ताने या सिनेमाची घोषणा कऱण्यात आली आहे. सुशांत सिंग प्रकरणातला संदीप सिंग आणि महेश मांजरेकर हे दोघे मिळून हा सिनेमा आणत आहेत. नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर महात्मा गांधींचा मृत्यू झाला. आता याच विषयावर सिनेमा येतो आहे.

महेश मांजरेकर यांनी काय म्हटलं?

नथुराम गोडसे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या व्यक्तिमत्वावर सिनेमा करायचा म्हणजे प्रचंड धैर्य हवं. मला कायमच हे वाटतं की आव्हानात्मक विषयांवर सिनेमातून भाष्य करता आलं पाहिजे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळी चालवली. नंतर त्याच्यावर खटला चालला. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली अशा मोजक्याच गोष्टी लोकांना माहित आहेत. त्याच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही या सिनेमातून करणार आहोत. ही गोष्ट सांगत असताना आम्ही कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेऊ. तसंच सिनेमा हा आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत कोण चूक होतं कोण बरोबर हे प्रेक्षकांनी ठरवावं असंही महेश मांजरेकर म्हणाले.

संदीप सिंगने काय म्हटलं आहे?

नथुराम गोडसे हा माझ्या पहिल्या सिनेमाचा विषय आहे. आपण आजवर अनेकदा महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत विविध बातम्या, किस्से आणि गोष्टी ऐकल्या आहेत. आजच्या पिढीला इतिहास ठाऊक व्हावा हा आमचा सिनेमा तयार करण्यामागचा मुख्य उद्देश आहे असंही संदीप सिंगने सांगितलं.

Related Stories

No stories found.