'केतकी चितळेला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही'; 'त्या' फेसबुक पोस्टवर कोण काय म्हणालं?

Ketaki chitale Facebook post : केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात विकृत भाषेतून टीका करण्यात आली आहे...
'केतकी चितळेला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही'; 'त्या' फेसबुक पोस्टवर कोण काय म्हणालं?

अभिनेत्री केतकी चितळे तिच्या फेसबुक पोस्टमुळे वादात सापडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या याच पोस्टवरून केतकी चितळेवर आता टीकेची धनी ठरली आहे. नेत्याकडून होत असलेल्या टीकेबरोबरच केतकी चितळेवर गुन्हाही दाखल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने एक फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात शरद पवार यांच्यावर विकृत शब्दात टीका करण्यात आलेली आहे. केतकी चितळेच्या ही पोस्ट आता चर्चेत आहे.

केतकी चितळेच्या पोस्ट कोण काय म्हणालं?

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, 'काही व्यक्ती या हिमालया एवढ्या असतात. सूर्यावरती थुंकलं की सूर्याचं महत्व कमी होत नाही. ही नशेबाज लोकं आहेत. यांना एक वेगळ्या प्रकारची नशा घडवलेली आहे. दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात, खिडकी उघडली की ते हवेबरोबर वाहून जातील,' अशी टीका राऊतांनी केली.

'केतकी चितळेला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही'; 'त्या' फेसबुक पोस्टवर कोण काय म्हणालं?
अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादात, शरद पवारांबद्दल फेसबुकवर टाकली पोस्ट

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यावरून केतकी चितळेवर टीका केली आहे. 'ज्या पद्धतीने टीका केली आहे, ती त्यांच्या मनातील विकृती आहे. आमच्या भगिनीने जे लिहिले आहे, ते अत्यंत घाणेरडेपणाचे आहे. शरद पवार हे मनाने खूप मोठे आहे. मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो, तर वेगळ्या पद्धतीने व्यक्त झालो असतो. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही आमच्या बापाबाबत लिहू शकत नाही," असं आव्हाड म्हणाले.

'केतकी चितळेला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही. केतकी चितळे मानसिक आणि गंजाडी अभिनेत्री आहे. तिच्यावर गुन्हे जरी दाखल झाले, तरी तिला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि तिचा मोबाईल नंबर आम्ही फेसबुकवर शेअर करणार. केतकी चितळेचे आई वडील तिला संस्कार देण्यात कमी पडले असावे असं वाटतं,' असं रुपाली पाटील म्हणाल्या.

केतकी चितळेच्या पोस्टचा ब्राह्मण महासंघाने निषेध केला आहे. ब्राह्मण सभा महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, 'केतकी चितळेवर गुन्हा दाखल आहे. राष्ट्रवादीबरोबरच आमचं वैचारिक शत्रूत्व कायम आहे. वेळोवेळी आम्ही त्याला विरोध केला आणि भविष्यातही करू. पण कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासत्मक लिहिणं. त्यांच्या मरणाची वाट पाहणे, ही विकृतीच आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे,' असं दवे म्हणाले.

Related Stories

No stories found.