मुख्यमंत्रीजी, मी तुमच्या मुलीसारखी, मला मदत करा; शर्लिन चोप्राने उद्धव ठाकरेंना जोडले हात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि वितरण रॅकेट प्रकरणात जामीनावर सुटलेल्या राज कुंद्रावर अभिनेत्री शर्लिन चोप्राने गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी शर्लिन चोप्राने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शर्लिन चोप्राने व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडत मदत करण्याची विनंती केली आहे.

शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर बलात्कार, लैगिंक शोषण, जिवे मारण्याची धमकी, अंडरवर्ल्डची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी एप्रिलमध्ये तक्रार दिली होती. मात्र, राज कुंद्राने धमकी दिल्याने मागे घेतली, असंही शर्लिन चोप्राने म्हटलं आहे. त्याचबरोबर नव्याने तक्रार दिली असून, तातडीने जबाब नोंदवला जावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत करण्याची विनंती केली आहे.

शर्लिन चोप्रानं काय म्हटलंय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मुख्यमंत्रीजी नमस्कार, आपला वेळ वाया न घालवता थेट मुद्द्याचं बोलते. राज कुंद्राविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2021 रोजी मी जुहू पोलीस ठाण्यात गेले होते. राज कु्द्राने माझी फसवणूक केल्याचं, बलात्कार केला, लैगिंक शोषण केलं. अंडरवर्ल्डची धमकी दिली, यासह विविध गोष्टी तक्रारीत नमूद केलेल्या आहेत. परंतु अद्याप मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलेलं नाही. माझी आपल्याला विनंती आहे की, जबाब नोंदवण्यासाठी मला बोलवलं जावं. जेणेकरून याची दखल घेतली जाऊन गुन्हा दाखल होईल आणि तपास सुरू होईल.’

‘तपास सुरु झाल्यानंतर अशा गोष्टी समोर येतील की, ज्यांचा खुलासा आजपर्यंत झालेला नसेल. मुख्यमंत्रीजी, यापूर्वीही मी जुहू पोलीस ठाण्यात गेले होते. 14 एप्रिल 2021 रोजीची ही गोष्ट आहे. त्यावेळी लैगिंक शोषण केल्याप्रकरणी राज कुंद्राविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मी वाट बघितली मात्र, मला बोलवलं गेलं नाही.’

ADVERTISEMENT

‘दरम्यान, 19 एप्रिल 2021 रोजी राज कुंद्रा माझ्या घरी आला. त्यांनी मला धमकावलं. अंडरवर्ल्डची धमकी दिली. मी इतकी घाबरले की, दुसऱ्या दिवशी (20 एप्रिल 2021) पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार मागे घेतली. मुख्यमंत्रीजी माझी इच्छा आहे की यावेळी तरी अशी वेळ येऊ नये. माझी इच्छा आहे की, जबाब नोंदवण्यासाठी मला तातडीने बोलवण्यात यावं’, असं शर्लिन चोप्राने ट्वीट केलेल्या व्हिडीओत म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

राज कुंद्राकडे अंडरवर्ल्ड आणि पैशाची ताकद…

दुसऱ्या व्हिडीओत शर्लिन चोप्राने राज कुद्रांबद्दल म्हणणं मांडलं आहे. ‘राज कुंद्राकडे अंडरवर्ल्ड आणि पैशाची ताकद आहे. ही ताकद माझ्याकडे नाही. माझी इच्छा आहे की, या लढाईत पीडितेला न्याय मिळावा. यासाठी मुख्यमंत्रीजी मला आपली मदत हवी आहे. मला आपली पाठिंबा हवा आहे. मी तुमची मुलगी आहे. मी या राज्याची मुलगी आहे. माझी इतकीच इच्छा आहे की माझा जबाब नोंदवला जावा. गुन्हा दाखल व्हावा आणि तपास सुरू करण्यात यावा. त्यानंतर सत्य समोर येईल. अशा गोष्टी समोर येतील ज्या कधीही समोर आलेल्या नसतील. मुख्यमंत्रीजी कृपया माझी मदत करा’, अशी कळकळीची विनंती शर्लिन चोप्राने केली आहे.

शर्लिन चोप्राच्या या व्हिडीओची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांनी शर्लिन चोप्राला प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक देण्यास सांगितलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT