'उत्कर्ष खेळायला गेलाय, रडून सहानुभूती मिळवायला नाही; चावडीच डबलढोलकी!'

आदर्श शिंदेचा नाव न घेता मांजरेकरांवर निशाणा, फेसबूक पोस्ट लिहत आदर्शने घेतली उत्कर्षची बाजू
'उत्कर्ष खेळायला गेलाय, रडून सहानुभूती मिळवायला नाही; चावडीच डबलढोलकी!'

बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व आता चांगलंच रंगतदार व्हायला लागलं आहे. प्रत्येक दिवशी टास्कदरम्यान खेळाडूंमध्ये होणारे गट, वाद-विवाद, भांडणं याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असून महेश मांजरेकर घेत असलेल्या चावडीवरच्या शाळेचीही चर्चा असते. पहिल्या आठवड्यादरम्यान महेश मांजरेकर यांनी घराचा कॅप्टन झालेल्या उत्कर्ष शिंदेला डबल ढोलकी म्हणत, त्याच्यावर एकांगी असल्याचा आरोप केला होता.

उत्कर्ष चा भाऊ आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेने फेसबूक पोस्ट लिहीत बिगबॉसची चावडीच डबल ढोलकी असल्याचा आरोप केला आहे.

'उत्कर्ष खेळायला गेलाय, रडून सहानुभूती मिळवायला नाही; चावडीच डबलढोलकी!'
Video : तुला पटो अथवा न पटो...हे Bigg Boss आहे तुझं घर नाही ! मीरा पुन्हा महेश मांजरेकरांच्या रडारवर

आदर्शने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये भाऊ उत्कर्षची बाजू घेत, माझा भाऊ या शो मध्ये खेळायला गेला असून रडून सहानुभूती मिळवायला गेलेला नाही असं म्हटलंय. आदर्शनच्या या फेसबूक पोस्टची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

दरम्यान दुसऱ्या आठवड्यात शिवलीला पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरुन शो सोडल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात एलिमिनेशन झालं नाही. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा महेश मांजरेकरांची चावडी भरेल त्यावेळी आदर्श शिंदेच्या या फेसबूक पोस्टची चर्चा होतेय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'उत्कर्ष खेळायला गेलाय, रडून सहानुभूती मिळवायला नाही; चावडीच डबलढोलकी!'
Bigg Boss Marathi : तुटलेल्या नात्याला नवी सुरुवात? स्नेहाला मिठी मारत अविष्कार म्हणाला...सॉरी !

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in