Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातून अखेर स्नेहा वाघ झाली आऊट

स्नेहाच्या जाण्याने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जात आहे. टीम ए मधील सदस्याच्या जाण्याने नेटकरी खुश आहेत.
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातून अखेर स्नेहा वाघ झाली आऊट

'बिग बॉस मराठी ३' च्या या आठवड्याच्या चावडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या आठवड्यात घरात अनेक राडे झाले. मांजरेकर यावर काय बोलतात, कुणाला सुनावतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले होते. सोबतच या आठवड्यात नक्की कोण घराबाहेर होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसलेले होते. अखेर अभिनेत्री स्नेहा वाघ या आठवड्यात घराबाहेर झाली आहे. स्नेहाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास अखेर संपला आहे.

गेल्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार, संतोष चौधरी आणि स्नेहा वाघ पात्र होते. त्यातील सोनाली हिला सगळ्यात जास्त मतं मिळाल्याने ती सेफ असल्याचं मांजरेकर यांनी शनिवारी जाहीर केलं. सोबतच गायत्रीदेखील सेफ झाली. उरलेले चौघेही डेन्जर झोनमध्ये होते. त्यातील स्नेहाचा प्रवास आज संपला आहे. स्नेहा घरात आल्यापासूनच सोशल मीडियावर चर्चेत होती. स्नेहासोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार दारव्हेकर देखील बिग बॉसच्या घरात होता. त्यामुळे या विभक्त पती- पत्नीच्या जोडीला एकाच छताखाली पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. त्यात स्नेहा आणि अविष्कारने त्यांच्या पूर्वायुष्याबद्दलही अनेक खुलासे केले.

त्यानंतर स्नेहा आणि जय यांची वाढती जवळीक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरली होती. स्नेहा आणि जय यांना त्यांच्या वागण्यावरून ट्रोलही करण्यात आलं. परंतु, आता स्नेहाने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. तर स्नेहाच्या जाण्याने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जात आहे. टीम ए मधील सदस्याच्या जाण्याने नेटकरी खुश आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in