गौहरला इंडस्ट्रीत काम करण्यास बंदी, कोरोना नियम मोडणं पडलं महागात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिच्या विरोधात काल मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केलाय. गौहरला कोरोनाची लागण झाली असताना देखील ती सार्वजिनक परिसरात फिरत असल्याने तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान नियमांचं उल्लंघन करणं गौहरला चांगलंच महागात पडलं आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉईजने गौहरवर सिनेमा इंडस्ट्रीत काम करण्यासाठी दोन महिन्यांची बंदी घातली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम २ व ३ नुसार गुन्हा दाखल केलाय.

पोलीस तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, गौहर हिची यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर घरातच विलगीकरण पद्धतीने राहणं बंधनकारक असताना देखील नियमांचं उल्लंघन करून गौहरने सार्वजनिक परिसरातील वावर सुरू ठेवला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT