बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला एनसीबीच्या ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जचं प्रकरण बाहेर आलं. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात ज्या कलाकारांची नावं समोर आली त्यांची एनसीबीकडून चौकशीही करण्यात आली. तर आता एनसीबीने या प्रकरणात अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला इथल्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं. त्यानंतर एजाज खान आज राजस्थानहून मुंबईत दाखल झाला त्याचवेळी एनसीबीने त्याला ताताडीने ताब्यात ताब्यात घेतलं. एजाजला ताब्यात घेतल्यानंतर त्याची एनसीबीकडून त्याची कसून चौकशी करण्यात येतेय.

बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये एजाज खानने सहभाग घेतला होता. बिग बॉसमध्येही एजाज खान नेहमी चर्चेत राहिला होता. दरम्यान बिग बॉसमध्येही एजाजचे अनेक वाद झाले होते. याच वादावादीवरून त्याला शोच्या बाहेर काढण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT