कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांंचं खास ट्विट; म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. महाराष्ट्रातही रूग्णसंख्या वाढ असून रूग्णांना बेड्सच तसंच ऑक्सिजनच्या कमतरतेला सामोरं जावं लागतंय. एकूणच सगळी परिस्थिती फार चिंताजनक झाली आहे. अशातच आता बॉलिवूडचे महानायक बीग बी यांनी कोरोना रूग्णांसाठी खास संदेश दिला आहे.

ADVERTISEMENT

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत जे लोकं कोरोनाशी लढत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याचसोबत अमिताभ यांनी सुरक्षित राहून नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

अमिताभ त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, जे लोकं कोरोनाग्रस्त आहेत, ते लवकरात लवकर यातून बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करते. जे कोरोनामुक्त झाले आहेत किंवा कोरोनामधून बरे होते आहेत अशा सर्वांसाठी देखील मी प्रार्थना करतो. तुम्ही सुरक्षित रहा आणि नियमांचं पालन करा.”

हे वाचलं का?

अमिताभ यांचं ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. अनेकांनी प्रार्थना केल्याबद्दल अमिताभ यांचे आभारही मानले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT