औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर अभिनेता रितेश देशमुख संतापला, म्हणाला…
कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचसोबत राज्यात अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन तसंच इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. एका ठिकाणी रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत असताना त्याचा फायदा घेऊन यांचा काळाबाजार होत असल्याच्या घटनाही समोर आहेत. यावर अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात अभिनेता रितेश देशमुखने ट्विट केलं आहे. रेमडेसिविर […]
ADVERTISEMENT
कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचसोबत राज्यात अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन तसंच इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. एका ठिकाणी रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत असताना त्याचा फायदा घेऊन यांचा काळाबाजार होत असल्याच्या घटनाही समोर आहेत. यावर अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
यासंदर्भात अभिनेता रितेश देशमुखने ट्विट केलं आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाज करणाऱ्या लोकांवर त्याने संताप व्यक्त केला आहे. रितेश त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे.”
हे वाचलं का?
नुकतंच काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने लोकांना सध्याच्या कोरोना काळात मास्क योग्य पद्धतीने वापरण्याबाबत अपील केलं होतं. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीयो शेअर करत रितेश म्हणाला होता, “मास्क घालताना योग्य पद्धतीने घाला. प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. कोरोनाची दुसरी लाट फार धोकादायक आहे.”
रितेश देशमुखप्रमाणे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांकडून लोकांना मास्क लावण्याचं अपील करण्यात येतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT