प्राजक्ताने मालिका सोडूनही अजूनही धमकीचे मेसेज येतात–अलका कुबल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेतील प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एेवजी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वीणा जगतापची वर्णी लागली. अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वादावर पडदा पडला असं वाटत जरी असलं तरी अजूनही या वादावर पुरता पडदा पडलेला दिसत नाही. अलका कुबल यांना आजही सोशल मिडीयावरून ट्रोल करण्यात येत आहे. अलका कुबल यांच्या सोशल मिडीयावरील अकाऊंटवर काहींनी त्यांना धमकीचेही मेसेज केले असल्याचं अलका कुबल यांनी मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत नुकतंच स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

आई माझी काळुबाई ही मालिका सुरू झाल्यानंतर या मालिकेतील मुख्य पात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड करत होती. या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यात सुरू होतं. या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ही मालिका अर्ध्यातूनच सोडली. अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच तु तु मै मै झाली. दोन्ही बाजूनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या गेल्या. यानंतर सोशल मिडीयावर प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल या दोघांचीच्याही फॅन्सनी या दोघींवर यथेच्छ टीकेला सुरवात केली.

वाद संपूनही अलका कुबल यांना का येत आहेत धमकीचे मेसेज? पहा व्हिडिओ

ADVERTISEMENT

सध्या हा वाद शमला असला तरी अलका कुबल यांना आजही सोशल मिडीयावर अत्यंत हीन भाषेत ट्रोल केलं जात आहे. मुंबई तकशी बोलताना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. अगदीच ८ दिवसांपूर्वी मला धमकीचा मेसेज आला होता असं अलका कुबल यांनी स्पष्ट केलं. तसंच एक निर्माती म्हणून मी प्राजक्ता गायकवाडने जितके एपिसोडस काम केलं आहे. त्याचा योग्य तो मोबदला तिला मिळणार असल्याचंही स्पष्ट केलं. असं असूनही प्राजक्ताच्या समर्थकांकडून मला सोशल मिडीयावर त्रास देण्याचा,धमकी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नसून , प्रेक्षकांनी आई माझी काळूबाईला उदंड प्रतिसाद दिला आहे. प्राजक्ताच्या जागी आलेल्या वीणा जगतापने अल्पावधीतच आपल्या कामाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं असल्याने, जे मागे वाईट झालं त्याला विसरून मी पुन्हा जोमाने कामाला लागल्याचं अलका कुबल यांनी मुंबई तक शी बोलताना स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यात नेमका वाद काय होता?पहा व्हिडिओ

प्राजक्ता गायकवाडने अलका कुबल यांच्या आरोपांवर काय दिलं होतं उत्तर? पहा व्हिडिओ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT