Amitabh Bachchan : बिग बींनी अयोध्येत केली कोट्यवधींची खरेदी, राम मंदिरा शेजारीच…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

amitabh bachchan buy plot in ayodhya near ram mandir worth crore rupees for build home
amitabh bachchan buy plot in ayodhya near ram mandir worth crore rupees for build home
social share
google news

Amitabh Bachchan Buys Plot In Ayodhya : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची देशातील नेतेमंडळी, कलाकार, खेळाडू आणि सर्वसामान्य नागरीकांना उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन अयोध्यावासी होणार आहेत. कारण अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. या जमीनीवर आता ते आपलं आलिशान घर थाटणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे अयोध्येत जमीन खरेदी करणारे ते पहिले कलाकार ठरले आहेत. बच्चन यांची आध्यात्मिक आवड पाहून आता चाहत्यांनी त्यांचे कौतुक करायला सुरूवात केली आहे. (amitabh bachchan buy plot in ayodhya near ram mandir worth crore rupees for build home)

ADVERTISEMENT

किती कोटीला जागा खरेदी?

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बंचन यांनी अयोध्येतील 7 स्टार प्रोजेक्ट ‘द शरयू’मध्ये एक प्लॉट खरेदी केला आहे. हा प्लॉट अगदी शरयू नदीच्या जवळच आहे. या प्लॉटवर आलिशान घर बांधण्याचे काम बिग बींनी मुंबई बेस्ड डेवलकर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांना दिले आहे. हा प्रोजेक्ट राम जन्मभूमी मंदिरापासून 15 मिनिटे दुर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 10 हजार स्क्वेअर फुटची जमीन खरेदी केले आहे. या जमिनीची किंमत 14. 5 करोडच्या घरात असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : Ram Mandir: शंकराचार्यांचा नारायण राणेंवर पलटवार, राम मंदिरावरून मोठं राजकारण

अमिताभ बच्चन काय म्हणाले?

वृत्तानुसार,बिल्डरशी बोलताना अभिनेत्याने मला माझ आलिशान घर बनवायचं असल्याची माहिती दिली आहे. मी अयोध्येतील शरयूसाठी द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा सह हा प्रवास सुरू करण्याहसाठी उत्सुक आहे. एक असे शहर ज्याचं माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. अयोध्येतील शाश्वत अध्यात्म आणि सांस्कृतिक समृद्धीने भौगोलिक सीमांच्या पलीकडे भावनिक संबंध निर्माण केला आहे. ही अयोध्येच्या आत्म्यापर्यंतच्या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात आहे, जिथे परंपरा आणि आधुनिकता अखंडपणे सहअस्तित्वात आहे, माझ्याशी खोलवर जोडणारी भावनात्मक टेपेस्ट्री तयार करते. मी जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बनवण्यास उत्सुक आहे.

हे वाचलं का?

आम्ही खूप खूश आहोत. अमिताभ बच्चन हे द शरयूचे पहिले नागरीक झाल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांचे आलिशान घर हे मंदिरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तसेच अयोध्या इंटरनेशनल एअरपोर्ट देखीस इथून अर्धा तासाच्या अंतरावर आहे, अशी माहिती कंपनीच्या चेअरमनने दिली आहे.

हे ही वाचा : शरद पवारांचा वसुलीचा धंदा, 435 कोटी…, किरीट सोमय्यांनी सांगितलं प्रकरण

दरम्यान 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. अमिताभसह रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राम चरण, दीपिका चिखलिया, अरूण गोविल, सुनील लाहिरी, कंगणा रणौत आदी कलाकारांनाा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT