अध्यात्मासाठी मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय; मनोरंजन सृष्टीला केला रामराम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या ‘अनुपमा’ मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री अनघा भोसले बऱ्याच दिवसांपासून मालिकेतून गायब होती. अखेर यामागील कारण समोर आलं असून, तिने मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मालिका सोडल्यानंतर आता अनघाने मनोरंजन सृष्टीलाच अलविदा केलं आहे.

ADVERTISEMENT

अनघा भोसलेनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने मनोरंजन सृष्टी सोडण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.

“हरे कृष्ण, मी मालिकेत दिसत नसल्यानं तुम्हा सगळ्यांना माझी काळजी वाटत असल्याचं मला माहितीये आहे. मला भरभरून प्रेम देणाऱ्या सगळ्यांचे आभार. अजूनपर्यंत ज्यांना माहिती नाही, त्यांना मी आज सांगतेय की, मी फिल्म्स आणि टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. माझ्या निर्णयाचा आपण आदर करावा आणि माझी साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. आध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे आपआपलं कर्तव्य करत राहाल. जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्यापासून स्वतः दूर ठेवाल हे मला माहिती आहे.”

“आपण सगळेच ईश्वराची मुले आहोत, यावर माझा विश्वास आहे. आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे, फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. आपण सगळ्यांनी विश्वास अबाधित ठेवला पाहिजे. माझ्यासाठी ईश्वर नेहमीच दयावान राहिला आहे. आपण ज्या उद्देशाने जन्म घेतला आहे, ते उद्दिष्ट पूर्ण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळ्यांची ईश्वराची इच्छा आणि प्रेम समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं तुम्हाला कुठलं उत्तर हवं असेल, तर ते भगवत गीतेतून मिळवू शकता. जे लोक माझ्यावर प्रेम करतात, त्यांना माझ्या आयुष्यातील घटनांचे माहिती वेळोवेळी देत राहिन. मी सर्व धर्मांचा आणि सर्वांच्या आयुष्याचा आदर करते”, असं तिने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी अनघा भोसलेने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही याबद्दल सांगितलं होतं. “इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मला याची जाणीव झाली की, मी ज्या पद्धतीने विचार केला होता, त्यापेक्षा इंडस्ट्री खूप वेगळी आहे. इथे राजकारण, जीवघेणी स्पर्धा, चांगलं दिसण्याची स्पर्धा आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ताण नेहमीच असतो. या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत, तर तुम्ही मागे पडता. या सगळ्या गोष्टी मला कळत नाही”, अनघाने म्हटलं होतं.

“इंडस्ट्री दुतोंडी लोकांनी भरलेली आहे. मला माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे आणि त्यामुळेच मी आध्यात्मिक गोष्टीचं अनुसरण करू इच्छिते. मी फक्त अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. प्रोफेशन सोडलेलं नाही”, असंही तिने म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT