कोण आहे एलन मस्कची नवी गर्लफ्रेंड नताशा बॅसेट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

हे वाचलं का?

एलन मस्क चर्चेत येण्याचं कारण आहे त्यांनी नवी प्रेमकहाणी. हो, एलन मस्कचे त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

एलन मस्कची नवी गर्लफ्रेंड आहे नताशा बॅसेट.

ADVERTISEMENT

५० वर्षीय एलन मस्क आणि २७ वर्षीय नताशा बॅसेट हे एका लग्झरी रेस्तराँमध्ये लंच करताना दिसले.

नताशा बॅसेट ही अभिनेत्री असून, एलन मस्कची आतापर्यंत कमी वय असलेली गर्लफ्रेंड आहे.

एलन मस्क आणि नताशा बॅसेटचे फोटो समोर आल्यानंतर लोक आता त्यांच्याबद्दल माहिती मिळवू लागले आहेत.

विशेषतः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक दिसत आहे.

नताशा बॅसेटबद्दल सांगायचं म्हणजे ती ऑस्ट्रेलियाची आहे. नताशाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

नताशा बॅसेटने वयाच्या १४ वर्षीच रोमिओ अॅण्ड ज्युलियट या नाटकात ज्युलियटची भूमिका साकारली होती.

एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच नताशा बॅसेट पटकथा लेखक आणि दिग्दर्शकही आहे.

२०१७ मध्ये म्युझिक आयकॉन असलेल्या ब्रिटनी स्पिअर्सची भूमिका साकारल्यानंतर नताशा प्रसिद्धीच्या झोतात आली.

अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी नताशा १९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियातून न्यूयॉर्कला गेली होती.

२०१४ मध्ये नताशा बॅसेटने एक शॉर्ट फिल्म काईटचं दिग्दर्शन केलं होतं.

सध्या नताशा बॅसेट अमेरिकेत राहते आणि तिने चित्रपटांचं दिग्दर्शनही केलंय. आता एलन मस्कसोबत दिसल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आलीये.

मिळालेल्या माहितीनुसार एलन मस्क आणि नताशा बॅसेट फेब्रुवारी २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

यापूर्वी नताशा बॅसेट आणि एलन मस्क हे एका प्रायव्हेट जेटमधून लॉस एंजलिसमध्ये उतरताना दिसले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT