ठरलेल्या दिवशीच रिलीज होणार ‘मुंबई सागा’; प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम स्टारर असलेला मुंबई सागा हा सिनेमा ठरलेल्या दिवशीच रिलीज होणार आहे. मुंबई सागा चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई सागा हा सिनेमा 19 मार्च म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. गँगस्टर डीके राव उर्फ रवी बोहरा आणि मृत अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईकचे भाऊ अश्विन नाईक यांनी […]
ADVERTISEMENT
इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम स्टारर असलेला मुंबई सागा हा सिनेमा ठरलेल्या दिवशीच रिलीज होणार आहे. मुंबई सागा चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई सागा हा सिनेमा 19 मार्च म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. गँगस्टर डीके राव उर्फ रवी बोहरा आणि मृत अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईकचे भाऊ अश्विन नाईक यांनी सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थिगिती आणण्याची मागणी केली होती.
ADVERTISEMENT
शुक्रवारी मुंबई सागा सिनेमा रिलीज होणार आहे. तुम्ही शेवटच्या क्षणाला का मागणी केली, असा कोर्टाने याचिकाकर्त्यांना सवाल केलाय. कोर्टाच्या सांगण्यानुसार, नाईक कुटुंबाने 2019मध्ये फिल्म मेकर्सना सिनेमासंदर्भात नोटीस पाठवली होती. त्यामुळे त्यांना चित्रपटाच्या निर्मितीबद्दल माहिती होती.
भरपूर अॅक्शनने भरलेला ‘मुंबई सागा’चा टीझर पाहिलात का?
हे वाचलं का?
दरम्यान वकील प्रशांत पांडे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हणलंय की, 26 फेब्रुवारी 2021 रोजी युट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे मनूद करण्यात आलं होतं की चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एका अभिनेत्याने सांगितलं की होतं की, तो अमर नाईकची भूमिका साकारतोय, याकडेही पांडे यांनी लक्ष वेधलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT